नबाबानं घाई- गडबडीनं नमाज उरकला आणि येऊन नानकांना म्हणाला, ‘बेईमान, धाेकेबाज, तुम्ही म्हणाला हाेता की नमाज पढण्यास साथ देईन, पण तुम्ही तसं काहीएक केलं नाही,’ नानक म्हणाले, ‘ मी म्हटलं हाेतं की नमाजात साथ देईन. पण तुम्ही जर नमाज पढलाच नाही तर साथ कुणाला देणार? नमाजाच्या ऐवजी न जाणाे तुमचं काय काय चाललं हाेतं - कधी माझ्याकडे पहात हाेता. दातओठ खात हाेता, कधी नाराज हाेता. हा कसला नमाज बुवा ! असला नमाज मला नाही हं ठाऊक. मग काय साथ द्यायची ? आणि खरंच आतून एकदा तरी अल्लाचं नाव घेतलं का ? कारण काबूलच्या बाजारात तुमची घाेड्यांची खरेदी चाललेली मला दिसली.’ तेव्हा नवाब आणखीच पेचात पडला. ताे म्हणाला, ‘अरेच्चा ! काबूलच्या बाजारातले घाेडे.आपण गाेष्ट सांगता ती खरी आहे. किती दिवसांपासून मी हा विचार करताेय की आपल्याजवळ चांगले घाेडे नाहीत.
मग अशा गाेष्टींचा विचार करायला नमाजाच्या वेळीच फुरसत मिळते, इतर वेळी सारखं, एक ना दुसरं काम निघतच राहतं. तेव्हा काबूलचे हे घाेडे नमाजाच्या वेळी सतावतात खरे.तुम्ही बराेबर सांगितलं. माझी खरेदी चालली हाेती.तुमचं म्हणणं बराेबर हाेतं. मला माफ करा. मी काही नमाज पढला नाही, फ्नत काबूलच्या बाजारात घाेडे विकत घेतले.’ लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूस्मरण करता, तेव्हा प्रभू साेडून बाकी सर्व गाेष्टींचं ध्यान करीत असता. प्रभूला तर तुम्ही जाणतच नाही. तेव्हा त्याचं स्मरण तुम्ही कसं करालं ? प्रभूचं ध्यान कराल तरी कसं ? कृष्ण म्हणताे ध्यानासाठी ही अट आहे. इतकं झालं तरच प्रभूचं ध्यान हाेतं, नाही तर हाेत नाही, हां, ते ध्यान इतर गाेष्टीचं हाेऊ शकेल.