जेथ नभाचेनि पाडें। समत्वा उणें न पडे। तेथ ज्ञान राेकडें। वाेळख तूं ।। 13.603

27 Mar 2023 15:18:51
 
 
 

Dyaneshwari 
पुढे केव्हातरी येणारे वृद्धत्व व राेग यांची जाणीव ठेवून ज्ञानी माणूस ऐन वयातच सावध हाेताे.हात लुळे पडतील हे लक्षात घेऊन ताे ते धड आहेत, ताेपर्यंतच सत्कृत्ये करील. मन वेडे हाेण्याआधीच आत्मज्ञानाचा विचार करावा. चाेर आपली संपत्ती नेतील, म्हणून आधीच ती दूर ठेवावी.म्हातारपण येण्याआधीच करावयाचे कर्तव्य करावे.म्हातारपण येईल, तेव्हा आपण आत्मविचार करू, आत्ता मजा करून घेऊ असे मानणारा मनुष्य दीर्घायुषी आहे काय? अग्नीची एकदा राखुंडी झाली, की ताे कधी काेणास जाळेल काय? म्हणून वृद्धपणाचे स्मरण तरुणपणीच असावे. इंद्रियांच्या विषयांचे मार्ग बंद करावेत. देहासंबंधी आसक्ती धरू नये. वाटसरू झाडाचा आश्रय जसा घेताे,तसे शरीराबद्दल मानावे. मुलाबाळांना वस्तीत आलेल्या वाटसरूप्रमाणे मानावे. त्याप्रमाणे सर्व ऐश्वर्य असले तरी अनासक्त वृत्तीने असावे.
 
ज्याचे स्त्रीपुत्रादिकांवर ार प्रेम नसते, ताे अनासक्त पुरुष ज्ञानाला आधार मानावा.सकाळ, दुपार व संध्याकाळ या तीनही काळी सूर्य ताेच असताे, त्याप्रमाणे सुख-दु:खांच्या प्रसंगी ज्ञानी पुरुष स्थिर असताे. ताे माझ्यावाचून कशाचीच इच्छा धरत नाही. त्याचे आणि ईश्वराचे अंथरूण एकच असते. पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला ज्याप्रमाणे शरीर व अंत:करण यांचा संकाेच वाटत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य माझ्याकडे वळताे. काेणत्याही ॠतूत आकाशात फरक पडत नाही.प्रिय वा अप्रिय वस्तूंच्या लाभाने लाभ व हानी हाेत नाही. अर्जुना, अशाच माणसाच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान असते. गंगा जशी समुद्रास जाऊन मिळते, त्याप्रमाणे हा ज्ञानी मनुष्य सर्व वृत्तींसह परमात्म्यास जाऊन मिळताे.
Powered By Sangraha 9.0