4. अतिथी: आपली भारतीय संस्कृती म्हणजे, ‘अतिथी देवाे भव’ पूर्वी याचे शब्दश: पालन हाेत असे. आजही बाहेरून थकून आलेल्या अतिथीचा पाहुणचार केला जाताे, त्याच्या विश्रांतीचाही विचार केला जाताे. फलभार असलेल्या वृक्षावर काही काळ सावली विसावून फळे खाऊन पक्षी उडून जाताे.वृक्षाचे जीवन कृतार्थ हाेते. त्याचप्रमाणे अतिथीच्या स्वागताने यजमानाला पुण्य मिळवता येते, ताे धन्य हाेताे.म्हणून त्याला मान द्यावा, त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे.
बाेध : ज्या व्यक्तीमुळे नवीन काही शिकायला मिळते, जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते, ती व्यक्ती त्याचा गुरू हाेय. म्हणून गुरूला नेहमी सन्मान द्यावा.