पत्र दहावे
‘‘आत्मज्ञान करून घ्या.’’ प्लेटाेच्या मते (इ.स.पूर्व 427 ते 347) सुंदर दिसणाऱ्या अनेक वस्तू असत्य आहेत परंतु साैंदर्य हे त्यांच्याहून वेगळे व सत्य आहे. त्याच्या मते सत्संकल्पनांचे जग हेच सत्य जग.प्लेटाे म्हणताे की, जड पदार्थ सृष्टीला स्वत:ची अशी चलन-श्नती नाही. आत्मा हा चैतन्ययु्नत असून जड- सृष्टीला चालना देणारा आहे. प्लेटाेच्या मते रचनाचतुर अशा ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली.
अॅरिस्टाॅटलच्या मते (इ.स.पूर्व 384 ते 322) सृष्टीची घडामाेड रात्रंदिवस चालू असल्यामुळे तिच्या बुडाशी जे शाश्वत आणि निरपेक्ष तत्त्व आहे त्यालाच ईश्वर म्हणावे. ईश्वर शुद्ध-बुद्धिरूप आहे. ताे कालक्रमदृष्ट्या नव्हे तर विचारक्रम दृष्ट्यादेखील प्रथमारंभी आहे. त्याचेहून श्रेष्ठ असे काहीही चिंतनीय नाही. विशेष सर्वनामाने जरी आपण त्याचा उल्लेख करीत असलाे तरी ईश्वर व्य्नती नसून सृष्टीचे घटनाकारक सर्वाेच्च तत्त्व आहे.
मी काेण आहे, मला काेणी निर्माण केले, हे विश्व काेणी निर्माण केले, या सर्वांचा काेणी नियंता आहे किंवा नाही.इत्यादी अनेक प्रश्नांची चर्चा उपनिषदकालीन ऋषींनी केली आहे. उपनिषदाचे सार म्हणजे गीता. अर्जुन हा वत्स आहे.उपनिषद् या गायी आहेत. त्या गाईचे दाेहन करणारा श्रीकृष्ण आहे व जे दूध निघाले त्याचे नाव गीतामृत.मनुष्य जास्तीत जास्त मन:शांतीसाठी हपापलेला असताे.शाेपेन हाॅवर या जर्मन तत्त्वज्ञानाने असे म्हटले आहे की, माझ्या मनाला जर काेणी शांती दिली असेल तर ती उपनिषदांनीच.उपनिषद्कालीन ऋषींनी ज्याप्रमाणे सूक्ष्म विचार केला त्याप्रमाणे युराेपिय तत्त्वज्ञान्यांनीदेखील आपापल्या तऱ्हेने सूक्ष्म विचार केला आहे.
तुला देवाच्या विचाराबद्दल माेठे औत्सु्नय आहे. काही युराेपिय तत्त्वज्ञ लाेकांचे देवाबद्दलचे विचार सांगितले. आता आणखी काही विचार समजून घे.एप्नियुरसचा जन्म इ.स.पूर्व 341 साली झाला.त्याच्यामते इंद्रियजन्य सुखापेक्षा मानसिक सुख श्रेयस्कर आणि कायम टिकणारे म्हणून सर्वश्रेष्ठ असे काेणते सुख असेल तर मनाची निर्विकार स्थिती. देव नाहीत असे एप्नियुरसचे म्हणणे नाही. परंतु त्यांचे जग वेगळे आणि माणसांचे जग वेगळे असे ताे मानताे.स्टाॅईकांच्या मते आत्म्याचे काम इंद्रियांची एकवा्नयता घडवून आणणे व जीवात्म्याचे शिवात्म्याशी एकजीव हाेणे, हेच परमाेच्च सुख. स्टाॅईकांचे मत असे आहे की, तर्कशुद्धता म्हणजेच तेज म्हणजेच जगदात्मा ऊर्फ ईश्वर.
त्यांच्या मते जड सृष्टी, जगदात्म्याने व्यापलेली आहे व जीवात्मा जडदेही आहे.त्याचप्रमाणे ताे देहरूपी आहे आणि ताे उराेभागात असताे.फायलाेने (इ.स.पूर्व 25 ते इ.स.50) असे म्हटले आहे की, साक्षात्कार हाच सर्वश्रेष्ठ मार्ग. त्याच्या मते ईश्वर एकमेव-सृष्टी नियंता आहे व ताे मध्यस्थामार्फत सृष्टीचे नियंत्रण करताे.तू असे लक्षात घे की, ईश्वर व सृष्टी ही प्रेमाच्या धाग्यांनी बांधलेली आहेत, असे ख्रिस्ती धर्माचे मत आहे, तर अनेक देव देवता त्यांच्यामध्ये मध्यस्थी करतात, असे नव-प्लेटाेवाद्यांचे मत आहे.