गीतेच्या गाभाऱ्यात

24 Mar 2023 15:36:49

Bhagvatgita
पत्र नववे साधू म्हणाला, ‘‘राजन, आपली कीर्ती ऐकून मी आपणाकडे आलाे आहे. सुखाेपभाेगाच्या ज्वालेत उभे राहूनही तुम्ही विर्नत राहू शकता यावर माझा विश्वास बसत नाही. मी किती तरी वर्षे तपश्चर्या करीत आहे तरी मला आत्मदृष्टीचा लाभ झाला नाही. तुम्हाला श्नय असेल, तर या बाबतीत गुरुकिल्ली काेणती ते सांगा.’’ किंचित हसून थिबा म्हणाला, ‘‘या वेळी मी कामात आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर मी काही वेळाने देईन. ताेपर्यंत आपण हा दीप घेऊन जा आणि अंत:पुरातील वैभव पाहून या. पण ध्यानात ठेवा, हा दीप जर विझला तर आपण वाट चुकालच पण आपल्याला शाेधून काढणेही कठीण जाईल.’’ अंत:पुरातील मजा पाहून ज्या वेळी साधू परत आला त्या वेळी राजाने विचारले,‘‘मद्याचे पेले आणि अप्सरांचे नृत्य यामुळे तुमचा चांगला वेळ गेला ना?’’ साधू म्हणाला, ‘‘महाराज, मी खूप वेळ अंत:पुरात हाेताे; पण माझे सारे लक्ष या दिव्यावर हाेते.
 
’’ राजा म्हणाला, ‘‘साधू महाराज, आत्मदृष्टीची गुरुकिल्ली आपणाला मिळाली का?’’ साधूने हाे म्हटले आणि राजाला साष्टांग प्रणिपात केला.तू आपल्या पत्रात लिहितेस, ‘‘देवाचे ध्यान करताना देव भेटत नाही. म्हणून मला दु:ख हाेते व डाेळ्यात अश्रू येतात.मला भीती वाटते की, अशा अश्रूमुळे माझ्या प्रकृतीवर वाईट परिणाम हाेईल का? माझ्या डाेळ्यांत जे अश्रू येतात ते चांगले का वाईट?’’ तुझा प्रश्न लाखमाेलाचा आहे. हा प्रश्न वाचून मला इतका आनंद झाला आहे की ताे शब्दाने वर्णन करण्यापलीकडचा आहे. देवाचे ध्यान करताना देव भेटत नाही, म्हणून अश्रू येणे ही भाग्याची गाेष्ट आहे. अश्रूमुळे तुझ्या प्रकृतीवर वाईट परिणाम हाेणार नाही इतकेच काय पण तुझी प्रकृती सुधारेल.
 
वैज्ञानिक दृष्ट्या विचार करताना अश्रूबद्दलजाे विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे, ताे तू लक्षात घे म्हणजे तुला नवीन प्रकाश दिसेल.
डाॅ. जेम्स बाँड म्हणताे, ‘‘आधुनिक जगातील मनुष्याच्या मनावर प्रचंड ताण पडताे, सध्याची माणसे अधून मधून मनसाे्नत रडतील तर त्यांच्या प्रकृतीच्या बऱ्याचशा तक्रारी दूर हाेऊन त्यांची आयुर्मर्यादा वाढेल.’’ चार्लस् डिकन्स म्हणताे, ‘‘आपल्या अश्रुंची आपणाला लाज वाटण्याचे कारण नाही. आपल्या अंत:करणात दु:खाच्या वादळामुळे उडालेली गरम धूळ पुन: थंड करून खाली बसविण्याकरता पडणारा पाऊस म्हणजे आपले अश्रू.’’ शेवटी तू आपल्या पत्रात लिहितेस, ‘‘माझ्या डायरीमध्ये मला काही विचार टिपून ठेवायचे आहेत. सखाेल विचार करून तुम्ही मला काही विचार कळवा.’’ ते विचार असे-
 
(1) उत्तमाची चाल सावकाशीची! वाइटाची चाल झपाट्याची! अत्तराचा फाया नाकाजवळ न्यावा लागताे.मैल्याचा दुर्गंध मैलावरून येताे.
(2) सर्वांत माेठी चूक म्हणजे आपली काेणती तेच न समजणे.
(3) कधी कधी फत्तरांतून पाण्याचा झरा निघावा त्याप्रमाणे दु:खातून सुख निघते.
Powered By Sangraha 9.0