ओशाे - गीता-दर्शन

23 Mar 2023 16:30:12
 
 

Osho 
बसता, उठता, झाेपता, जागता, खाता- पिता एकच स्मरण करीत राहिला, पुनरावृत्ती करीत राहिला, समजत राहिला मी शरीर नव्हे. एक महिन्यानंतर त्याने डाेळे उघडून स्वतःला पाहिले.आपल्या शरीराकडे आणि ही गाेष्ट प्रकर्षाने त्याच्या लक्षात आली की शरीर मी नव्हे. त्याच्या आंतर्यात्रेचा एक टप्पा पूर्ण झाला. पुढे लिहिताे- हे शरीर म्हणजे मी नाही हे प्नकं झाल्यावर मी पुन्हा डाेळे बंद केले आणि हे ठरवलं की मी काेण आहे ? हे समजण्याच्या यात्रेला आता चलायचं. मी काेण नाही हे प्नकं झालं. पण काेण आहे ते आता पाहायचं आणि मी जेव्हा आत डाेकावलं तेव्हा छांदाेग्य उपनिषदाची गाेष्ट लक्षात आली आत एक अंतर्गुहा आहे - हृदयाची - जिथं मी आहे. जाे मी आहे. आणि जसा जसा मी त्या गुहेत प्रवेश करू लागलाे तसं एका रहस्याचं उकलन हाेत राहिलं, तसं तसं एक आश्चर्य मला आढळलं, मी जितका आत जात राहिलाे तितका मी संपत गेलाे, मी निव्वळ एक शून्य राहिलाे.पूर्ण एकांतच राहिला. आता मीही नाही राहिलाे.
 
माझी उपस्थिती देखील एकांताचा भंग करणारी अडचण आहे.तेव्हा जाे कृष्णाला अभिप्रेत आहे ताे एकांताचा अंतिम अर्थ तुम्हाला सांगताे.आपणही उरलात तरी एकांत नाहीये. एक क्षण असा येताे, जेव्हा तुम्हीही नसता. केवळ चैतन्य उरतं. मीही आहे अशी जाणीवही तुम्हाला नसते.फ्नत असणे उरते. त्या शुद्ध असण्यात एकांत असताे. त्या एकांतात प्रभूचं ध्यान केलं जातं.ध्यान कसलं, ते ! त्या एकांतात प्रभूला जाणूनच घेतलं जातं. त्या एकांतात प्रभूंशी मीलनच हाेऊन जातं. तिथं दाेन उरतच नाहीत. एकत्व असतं.तेव्हा कृष्ण म्हणताे की असा पुरुष एकांतात प्रभूचं ध्यान करताे. ध्यान हा फार अद्भुत शब्द आहे.
Powered By Sangraha 9.0