आपणांसी वाेळखाे जातां । आंगी बाणे सर्वज्ञता।।2।।

22 Mar 2023 14:33:45
 
 
 

saint 
सद्गुरूकृपा हाेण्यापूर्वी अशा गं्रथांचे वाचन, मनन आणि चिंतन केले असल्यास साधकाला निश्चितपणे त्याचा ायदाच हाेत असताे. पूर्वी पुराणकाळापासून त्या आत्मज्ञानामुळे जे ज्ञानी आणि विश्ववंदनीय प्रज्ञावंत झाले त्यांचे स्मरणसुद्धा प्रेरणादायी असते. व्यास, वशिष्ठ, वाल्मीकी, शुक, नारद, जनक राजा, अत्रि, शाैनक आदी महाज्ञानी या आत्मज्ञानामुळेच महाज्ञानी हाेऊन अजरामर झाले.असे हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची पहिली पायरी म्हणजे मी काेण आहे, हे जाणण्याची तीव्र इच्छा हाेय. ही इच्छा, हा हेतू मनात धरून जाे या ज्ञानाची साधना आणि उपासना करेल ताे एक दिवस निश्चितपणे ज्ञानी बनेल. त्या ज्ञानप्राप्तीच्या क्षणी त्याचे देहाचे ममत्व व एकरूपता संपून जाईल. देहाशिवायच्या आत्मस्वरूपी ‘मी’ची त्याला ओळख हाेईल.
 
असा आत्मस्वरूपी ‘मी’ सर्व चराचर सृष्टी व्यापून राहिला आहे, ही भावना हाेईल. हे प्रत्ययास येईल आणि मग अशा वेळी मी देही आहे ही संकुचित भावना पूर्णपणे नष्ट हाेऊन मी त्या चिदानंद परमात्म्याचा अंश आहे, हे प्रत्ययास येईल.अशा वेळी अभिमान पूर्णपणे नाहीसा हाेऊन स्वतःचे खरे स्वरूप ‘स्वस्वरूप’ त्याच्या हृदयात स्पष्ट हाेईल. ताे स्वतः प्रत्यक्ष परमात्मस्वरूपच हाेऊन जाईल. ही परमार्थातील सर्वश्रेष्ठ अवस्था प्रत्येकाला श्रद्धेने, निश्चयाने आणि उपासनेने प्राप्त हाेऊ शकणारी आहे, हे लक्षात घेऊन तसा प्रयत्न करावा, हेच श्रीसमर्थांचे सांगणे आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
Powered By Sangraha 9.0