ओशाे - गीता-दर्शन

22 Mar 2023 14:32:25
 
 

Osho 
 
मी भारतीय आहे.’ यावर पाेप खूष झाला.मेननने पुस्तकात लिहिले आहे, मी कुणी विशिष्ट आहे म्हणून वा माझी भारतीयाशी भेट झाली म्हणून पाेप खूष झाला असे नाही. ताे खूष यासाठी झाला की पाेप चूक करीत नसताे. पण मेननने पुढं लिहिलं आहे की त्या दिवसापासून माझ्या डाे्नयात एक नवंच विचारचक्र सुरू झालं की मी काेण आहे? मी हा चामडं, मांस, हाडं यांची गाेळाबेरीज आहे का? मी काेण आहे? खरंच जर या पाेपनं माझ्या डाेळ्यात डाेकावून पाहिलं असतं, आणि म्हटलं असतं, ‘‘ठीक आहे, तुझं शरीर भारतीय असेल वा इंग्रजी, पण तू काेण आहेस ? की तू शरीरच आहेस?’’ ‘मग मी काेण आहे ?’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्याने माेठी शाेधमाेहीम सुरू केली. त्याने खूप प्रयत्न केला, खूप धुंडाळलं, आटापिटा केला.
 
आपल्याला कल्पनाही करता येणार नाही पण शेवटी त्याला उत्तर मिळालं, ते छांदाेग्य उपनिषदात. हे उपनिषद् वाचताना त्याला हा शब्द ऐकू आला, हृदय-गुहा (इनर स्पेस ऑफ द हार्ट), आंतर हृदयाचं आकाश! त्याने असा निष्कर्ष काढला की मी काेणीही असेन. जर मी हृदय गुहेतच प्रवेश केला, तरच माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, नाहीतर काही मिळणार नाही. मग त्याने स्वतः ला एका खाेलीत कित्येक महिने बंद करून घेतलं. काेणीतरी ठराविक वेळी जेवण खाेलीत सरकवून जाई, ताे जेवण घेई. कुणी पाणी ठेवून जाई. ताे पाणी पिऊन घेई. ताे डाेळे बंद करून एक ध्यास नि एकच चिंतन करू लागला, की मी काेण आहे ? मी शरीर तर नाही.महिनाभर ताे मी शरीर नाही. या ध्यासात गुंग हाेऊन गेला. एक महिनाभर त्याने ‘मी शरीर नाही’ याशिवाय दुसरा काेणताच शब्द उच्चारला नाही.
Powered By Sangraha 9.0