अगा स्वधर्मु हा आपुला। जरी कां कठिणु जहाला। तरी हाचि अनुष्ठिला। भला देखें।। (3.219)

22 Mar 2023 14:26:58
 

Dyaneshwari 
 
भगवद्गीतेमध्ये स्वधर्म हा शब्द स्वकर्तव्य या अर्थाने आलेला आहे. आणि हे कर्तव्य इंद्रिये दमन न करता परमात्म्याकडे लावल्याने साध्य हाेईल. नाहीतर इंद्रियांची ओढ स्वाभाविकच बाह्य विषयांकडे असते.यामुळे आपल्या मनास संताेष हाेईल हे खरे, पण ते आपणांस कायमचे सुखी करणार नाहीत. काही साेबती गावाची वेस ओलांडेपर्यंतच आपले मित्र असतात.नंतर मात्र ते केव्हा लुबाडतील ह्याचा नेम नाही. ह्याचप्रमाणे इंद्रियांचे विषय चाेर समजावेत.अर्जुना, या इंद्रियाविषयांचा लाेभ आपणांस लागला की त्यात आपला नाशच हाेताे. आमिषाला भुलून मत्स्य जसा अडकून पडताे तसे आपण विषयरूपी दु:खात गुंतून पडू. म्हणून काम, क्राेध इत्यादी विषय आपल्याला घातकच आहेत. त्यांच्याकडे चित्त देऊ नये. अशवृत्तीने राहून आपण आपल्याच कर्तव्य-धर्माचे पालन केल्यास आपले कल्याण हाेईल.
 
दुसऱ्याचा धर्म वरवर कितीही चांगला दिसला तरी आपण आपल्याच धर्माचे म्हणजे कर्तव्याचे पालन केले पाहिजे. इतर लाेकांची उंचउंच व वैभवशाली घरे पाहून आपण आपल्या झाेपड्या माेडून टाकाव्या का? ज्ञानेश्वरांनी आणखी एक दृष्टांत दिला आहे, ‘हें असाे वनिता आपुली। कुरूप जरी जाहली। तऱ्ही भाेगितां तेचि भली। जियापरी।’ (224) अरे अर्जुना, आणखी असे पहा की, आपली स्वत:ची बायकाे जरी कुरूप असली तरी तीच स्वीकारणे आपल्या हिताचे असते. याप्रमाणे आपला धर्म जरी कठीण वाटला तरी अंती ताे सुखदायक आहे. साखर आणि दूध गाेड असले तरी आजारी माणसाला ते द्यावे काय ? त्याचा परिणाम हितकर हाेणार नाही. याच दृष्टीने आपण आपल्या कठीण धर्माचेही पालन करणे अगत्याचे हाेणार आहे. अर्जुनाने आपला क्षत्रिय धर्म विसरू नये असे भगवंताना वाटते.
Powered By Sangraha 9.0