पत्र नववे जत्रेत गर्दी बरीच झाली हाेती. त्या गर्दीमध्ये मुलाचे बाेट सुटले व मुलाची व आईची चुकामूक झाली. मुलगा आई, आई असे म्हणत रडू लागला.एक लहान मुलगा रडताे आहे असे पाहून लाेकांनी त्याला पुष्कळ खेळणी आणून दिली, पण मुलगा ती खेळणी घेईना.आई पाहिजे, आई पाहिजे असे म्हणून रडू लागला.आईची चुकामूक झाल्यानंतर त्या मुलाला खेळणीसुद्धा नकाेशी वाटतात, या गाेष्टीचे मर्म तू लक्षात घे.आपण नेहमी कृष्णमातेचे बाेट धरून जीवनात प्रवास करावा.
तू विचारतेस की अमाप पैसा, अप्रतिम साैंदर्य व प्रचंड कीर्ती असून काही लाेक दु:खी का असतात? याचे कारण असे की, त्यांना मन:शांती असत नाही. गीता वाचून माणसाला मन:शांती मिळत असते. मन:शांती नसेल तर पैसा, साैंदर्य, कीर्ती काय कामाची? तुला माहीत असेल की, सुप्रसिद्ध अमेरिकन नटी मॅरेलीन मॅन्राे हिला अमाप पैसा हाेता, अप्रतिम साैंदर्य हाेते व प्रचंड कीर्ती हाेती, पण मन:शांती नसल्यामुळे तिने झाेपेच्या गाेळ्या खाऊन आत्महत्या केली.हल्ली वृत्तपत्रांत चातुर्वर्ण्य व जातीयवाद याबद्दल खूप चर्चा चालू आहे, या चर्चेमध्ये किती तरी लाेक परस्परांना भरपूर शिव्या देत आहेत. साहजिकच तुझे कुतूहल जागृत हाेऊन तू काही प्रश्न विचारले आहेस. त्यांची उत्तरे थाेड्नयात अशीगीतेच्या चाैथ्या अध्यायात
13 व्या श्लाेकात भगवान श्रीगाेपालकृष्ण म्हणतात.‘‘चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागश:’’ मी चार वर्णाची व्यवस्था गुण व कर्म यांच्या भेदानुसार निर्माण केली आहे.यावरून तुला कळून येईल की, चातुर्वर्ण्य हे गुण व कर्म यांच्यावर अधिष्ठित आहे.ज्ञानेश्वरीत म्हटले आहे की, ‘‘आता याचिपरी जाण। चाऱ्ही आहेती हे वर्ण। सृजिले म्या गुण। कर्म भागे ।।77।। जे प्रकृतीचे नि आधारें। गुणाचेनि व्यभिचारें। कर्मे तदनुसारें। विवंचिली।।78।। एथ एकचि हे धनुष्यपाणी। परी जाहले गा चहूं वर्णी। ऐसी गुणकर्मी कडसणी। केली सहजे ।।79।। आरंभी चार वर्ण गुणकर्मावर अधिष्ठित हाेते, वाद नाही.
इतिहास असे सांगताे की, कालानंतर हे चार वर्ण जन्मसिद्ध मानले जाऊ लागले व पुढे तर त्यांचे जाती संस्थेत रूपांतर झाले.सिडनेलाेयाने ‘‘व्हिजन ऑफ इंडिया’’ या ग्रंथात हिंदूंच्या जातीयवादाची फार प्रशंसा केली आहे व या जातीयवादामुळेच कितीतरी आपत्तीतून हिंदूसमाज तरू शकला, असे म्हटले आहे.‘‘हिंदू ट्राईब्स अँड कास्टस्’’ या ग्रंथात शेअरिंग याने जातीयवादाची कमालीची निंदा करून हा जातीयवाद म्हणजे मनुष्य जातीवरील एक कलंक आहे, असे म्हटले आहे.युराेप अँड एशिया’’ या ग्रंथात मेरिडिथ टाउनसेंड याने हिंदूंच्या जातीय वादाला स्वर्गापर्यंत नेऊन पाेचवले आहे तर ‘‘एन्शंट लाॅ’’ या पुस्तकात मेनने त्याला पाताळात ढकलले आहे.