सिदाेरी तें पापपुण्य । सवें सिण भिकेचा ।।2।।

21 Mar 2023 15:24:02
 

saint 
 
सासूपणाच्या ताेऱ्यात सुनेचा छळ केला तर म्हातारपणी किंवा अंथरूणावर पडल्यावर कळत न कळत सून सासूला तिची जागा दाखवते. मुलांवर अन्याय केला तर ती माेठी झाल्यानंतर सूडाने पेटून बदला घेतात.तारुण्यात माणूस बाहेरख्याली झाला तर त्याला एडस्ला सामाेरे जावे लागते.आवश्यकतेपेक्षा जास्त व नकाे ते खाल्ले पिले तर विविध आजारांना, राेगांना सामाेरे जावे लागते.सत्तेच्या मस्तीत लाेकांवर अन्याय केला तर कालांतराने का हाेईना पण हाल अपेष्टांना सामाेरे लावे लागते. हे सर्व समाजात घडतअसलेले आपण उघड्या डाेळ्यांनी पाहताे. मी-मी म्हणणारा धुळीस मिळालेलाही आपण पाहिला असेल.
 
ज्या हाताने लुटून माेठा झाला ताकालांतराने का हाेईना लाेकांसमाेर हात पसरताे.सत्तेची धुंद ज्याने जाेपासली ताे केव्हातरी हताश हाेऊन मान खाली घालून जगण्याचा प्रयत्न करताे. हा सर्व काळाचा महिमा आहे.जाे चांगले करताे, ताे चांगलेच जगताे. जाे वाईट करताे, त्याला त्याचे परिणाम हे भाेगावेच लागतात. आपणाला वाटत असते कीचांगल्यांनाच त्रास हाेताे, वाईट मात्र मजा मारतात.हे फक्त विशिष्ट काळापुरते असते. अंतिमत: चांगले ते चांगलेच व वाईट ते वाईटच.जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0