तरुणसागरजी

21 Mar 2023 15:22:47
 
 
 
Tarunsagarji
 
पैसा कमवण्यासाठी काळीज पाहिजे; परंतु दान करण्यासाठी त्यापेक्षाही माेठे काळीज पाहिजे. मी पैशाच्या बाबतीत वावगं म्हणणार नाही. कारण, आपले जीवन आणि जग या दाेन्ही ठिकाणी पैशाला किंमत आहे हे काेणीही नाकारू शकत नाही. हा, पण हेही तितकंच खरं की, पैसा ‘काही एक’ असू शकेल, ‘बरंच काही’ असू शकेल, ‘खूप काही’ असू शकेल; पण ‘सर्व काही ’असू शकत नाही. जे लाेक पैशालाच सर्वस्व मानतात, ते पैशासाठी आपला आत्मा विकण्यासही पुढे-मागे पाहात नाहीत.
 
 
Powered By Sangraha 9.0