आईच आपला पहिला गुरू हाेय, हेही लक्षात ठेवावे.
बाेध : (सहवासात येणारी) परस्त्री मातेसमान मानून तिचा आदर करावा.आधुनिक काळात ‘या दृष्टीचा’ अभाव असल्यानेच स्त्रीवरील अत्याचार वाढले आहेत. सख्खी बहीण, चुलतबहीण, मामेबहीण, आतेबहीण; तसेच सख्खा भाऊ, चुलत भाऊ, मामेभाऊ, आतेभाऊ, माेठे दीर किंवा मेव्हण्यांना आदराने ‘भाऊजी’ असे म्हणण्यात मनाला एक वळण लागणे अपेक्षित आहे. पुरुष आणि स्त्रियांना एक दृष्टी दिली जाते. मनावर चांगले संस्कार हाेतात; परंतु आज फक्त बाॅये्रंड आणि गर्लें्रड हेच दाेन शब्द ऐकू येतात. यामुळे मुलीकडे बघण्याचा दृष्टिकाेन बदलताे, अशावेळी मुलींवरील अत्याचार वाढले तर नवल ते काय!