ओशाे - गीता-दर्शन

18 Mar 2023 15:06:10
 
 

Osho 
 
रवींद्रनाथांच्या एका पात्राला त्याची प्रेयसी ताे लग्नासाठी खूप मागे लागल्यावर म्हणते-‘ठीक आहे आपण करूया लग्न’.ते पात्र म्हणते ‘मी तुझ्याशी विवाह करीन पण तुझी ही जी दुसरी अट आहे, ती काही माझ्या डाे्नयात शिरत नाही.’ कारण तिची अट अशी आहे की, ‘विवाह तर करूच, पण सराेवराच्या एका किनाऱ्यावर मी राहीन आणि दुसऱ्या किनाऱ्याला तुम्ही रहाल. अन् मग कधी कधी एकमेकांना आमंत्रण देऊन आपण भेटत राहू किंवा सराेवरात नाव वल्हवताना किंवा नदीकाठाने फिरताना जर गाठ पडली तर काेणत्यातरी झाडाखाली बसून गप्पा मारू.’ मग ताे पुरुष म्हणताे ‘असं जर असेल तर मग लग्न करायचंच कशाला? आपण विवाह न केलेलाच बरा. नाही का?
 
’ पण ती स्त्री म्हणते, ‘विवाह तर करूच, पण थाेडं अंतर ठेवून राहू. त्यामुळं एकमेकांना दुसऱ्याची आठवण येत राहील.एकमेकांना आपण विसरणार नाही. कुठं असं हाेऊ नये की खूपच जवळ राहिलं तर आपण एकमेकांना विसरूनच जाऊ.’गैरहजेरीमुळे आठवणीला तजेला येताे. म्हणून गर्दीत आहात असं समजू नका.गर्दीत असणे याचा अर्थ गर्दी आपल्या आत असणे असा आहे. तर मग आपण गर्दीत आहात.जर आपल्या आत गर्दी नाही, तर मग आपण एकदम एकटे आहात.कृष्णासारखा माणूस काेठेही असाे, कितीही गर्दीत वा भर बाजारात, तरी त्याच्या दृष्टीने ते अरण्यच, जंगलच आहे. आपल्यासारखामाणूस काेठेही असाे, जंगलात असला तरी गर्दीतच आहे, बाजारच आह
Powered By Sangraha 9.0