चाणक्यनीती

17 Mar 2023 19:27:13
 
 
 

Chanakya 
वाच्यार्थ : राणी, गुरुपत्नी, मित्राची पत्नी, पत्नीची आई आणि आपली आई या पाच स्त्रियांना मातेसमान (पूजनीय) मानावे.
 
भावार्थ : स्त्रीची अनेक रूपे आहेत; माता, पत्नी, कन्या, स्नुषा, सासू इत्यादी. स्त्री आणि पुरुष यांच्यात नैसर्गिक आकर्षण असते. स्त्रीचे रूप (लावण्य, तारुण्य) गुण पाहून पुरुषांना तिची भुरळ पडून त्यांच्या मनात तिच्याविषयी वाईट विचार येऊ शकतात.यासाठी मनाला वळण-शिस्त लावणे गरजेचे आहे. विशेषत: ज्या स्त्रियांशी नेहमी संबंध येताे अशांना मातेसमान मानल्यास मनात पाप येणार नाही. जसे की, खालील स्त्रिया - 1. राजपत्नी : राजा प्रजेच्या समस्या साेडविताे, रक्षण करताे, सांभाळ करताे. म्हणून राजपत्नी ही मातेसमान पूजनीय मानावी.
Powered By Sangraha 9.0