दुर्बळ हे अवघे जन । नारायणीं विन्मुख ।।2।।

16 Mar 2023 17:27:52
 
 

saint 
 
प्रत्येकजण नारायण आहे हे सत्य असले, तरी माणसाला स्वत:चा खरा परिचय हाेत नसल्याने त्याला त्याचे नारायणत्व जाणवत नाही. आपल्यातील नारायणाचा परिचय करून घ्यायचा असेल, तर प्रथम मीपणा साेडावा लागताे. मीपणा साेडला, तर आपणाला खऱ्या अर्थाने आपल्यातील शक्तीची जाणीव हाेते.आपण जर मीपणा आणि अहंकाराच्या ताेऱ्यात जगत असू, तर आपले आयुष्य कधी संपले व आपल्यासमाेर काळ केव्हा येऊन उभा राहिला हे आपल्या लक्षातही येणार नाही. मीपणात जगणाऱ्या म्हणजेच स्वत:ला मी मी म्हणणाऱ्या माणसाला काळासमाेर आपले दुर्बलत्व मान्यच करावे लागते. स्वत:ला स्वत:चा खरा परिचय झाला असता, तर काळाला भिण्याची वेळ आली नसती.
 
पण, दुर्दैवाने नमूद करावे लागते की, संसारात अडकलेल्या जीवाला माया, माेह, अहंकार, ईर्षा, द्वेष, मत्सर, स्पर्धा आदीमुळे स्वत:चा खरा परिचय करून घेण्याचे भानच राहात नाही. स्वत:च स्वत:ला विसरणे म्हणजे खराेखरच निव्वळ वेडेपणा हाेय. बुद्धिजीवी माणसांकडून असा वेडेपणा हाेऊ नये म्हणून संत, महात्मे स्वपरिचयाचा मार्ग दाखवित असतात.ज्याला स्वपरिचयाचा मार्ग सापडला ताे श्नितहीन हाेत नाही आणि नारायणाशी विन्मुखही हाेत नाही.
जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0