पत्र आठवे
गुरूदेवांनी देवाला प्रार्थना केली की, ‘‘देवा, हे सामर्थ्य मला नकाे. ही नसती पीडा माझ्यामागे लावू नकाेस. मला फ्नत तुझी भ्नती दे.’’ तू म्हणताेस की, गीतेचा सखाेल अभ्यास करणारे गुरूदेव रानडे यांनी प्रयागाला गंगातटाकी बंगला बांधला, त्यामुळे त्यांना राेज गंगास्नान घडत असेल. तुला असे वाटणे साहजिकच आहे. तात्यासाहेब केळकरदेखील असे म्हणत असत की, गंगास्नान सुलभपणे घडावे म्हणून प्रा.रानडे यांनी प्रयागला गंगातटाकी बंगला बांधला.स्तुस्थिती अशी हाेती की, प्रयागच्या 25 वर्षांच्या वास्तव्यात गुरूदेवांनी एकदाही गंगास्नान केले नव्हते. नंतर जेव्हा त्यांचे व्याही अण्णासाहेब आपटे आपल्या माताेश्रींच्या अस्थी टाकण्यास प्रयागला गेले हाेते तेव्हा त्यांच्याबराेबर गुरूदेव संगमावर गेले हाेते.
तू आपल्या डायरीत लिहून ठेव की,
(1) ‘‘भ्नती नसता परमार्थ करू पहाणे म्हणजे पाेटाला पाषाण बांधून नदी पाेहून जाण्याच्या गप्पा मारण्यापैकी आहे.’’
(2) ‘‘बाेलाचीच कढी आणि बाेलाचाच भात, अशाने तृप्तीची नाही बात.’’
(3) ‘‘भ्नत असे माता। आणि शांती असे दुहिता.’’
(4) ‘‘अहंकार जाईल जरी। येईल तरी जवळ हरी.’’ तू अलीकडे विवेकानंद वाचत आहेस. स्वामी विवेकानंदांनी गीतेचा व आपल्या धर्माचा फार सखाेल अभ्यास केला हाेता.
त्यांचे खालील विचार नितांत मनन करण्यासारखे आहेत.‘‘पुण्यभूमी या नावास पात्र अशी एखादी भूमी यापृथ्वीतलावर असेल तर ती भारत हीच हाेय. नद्या-पर्वतांच्या आणि महासागरांच्याही पलीकडे द्निकालाचे अंतर ताेडून भारतीय विचारप्रणाली पृथ्वीवरील इतर राष्ट्रांच्या धमन्यांतून वाहते आहे.‘‘नासत: सत् जायते-अभावातून अस्तित्व निर्माण हाेऊ शकत नाही. आपल्या प्राचीन कवींनी हे तत्त्व गायिले व तत्त्वज्ञांनी ते सूत्रबद्ध केले. ही प्राचीन भूमी म्हणजे नंतर जगभर पसरलेल्या ज्ञानाचे माहेरघर आहे. आत्म्याच्या अमरत्वाचे तत्त्व हे प्रथम प्रकटझाले. हीच ती भूमी की जेथून अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांच्या लाटामागून लाटा उठल्या आणि त्यांनी सर्व जग व्यापून टाकले.
‘‘ग्रीकांच्या प्रचंड सैन्याच्या नुसत्या पदाघाताने पृथ्वीचा थरकाप हाेई, असा एक काळ हाेता. त्याच ग्रीक लाेकांचे काय झाले ते सांगण्यापुरतेदेखील ते आज उरले नाहीत. एकेकाळी राेमन साम्राज्याची पताका जिकडे तिकडे गाजत हाेती. ज्या कॅपिटाॅल टेकडीवर शेकडाे राेमन वीरांचे पुतळे हाेते तेथे आज दगड-मातीचे ढिगारे उरले आहेत. पण आम्ही आजही जिवंत आहाेत. आज इतकी वर्षे आमच्यावर इतके प्रहार झाले तरीदेखील आम्ही जिवंत आहाेत याचे कारण राष्ट्र शरीरात खेळणारे र्नत जेथून प्रभावित हाेते ते हृदय म्हणजे आमचा धर्मभाव आहे हे मी आपल्याला विश्वासपूर्वक सांगताे.‘‘परंतु एक गंमत आहे. येशू ख्रिस्त म्हणतात, की जाे तुमच्या उजव्या गालावर प्रहार करील त्याच्यापुढे दुसरा गाल करा. आमची गीता आम्हाला सांगते, की तुमचे शत्रू नष्ट करा आणि जगाचा उपभाेग घ्या.‘‘पण शेवटी येशू ख्रिस्त आणि गाेपालकृष्ण या दाेघांना जे जे हवे हाेते, ते ते नेमके उलटे झाले.