चाणक्यनीती

15 Mar 2023 15:10:22
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : जन्मदाता, उपनयन संस्कार करणारा, ज्ञान देणारा गुरू, पालनपाेषण करणारा (अन्नदाता), भयमुक्त करणारा (आध्यात्मिक गुरू) हे सर्व (पाच) पित्याप्रमाणे पूजनीय आहेत.
 
भावार्थ : पिता काेणास म्हणावे?
 
1. जन्मदाता - जन्मदाता पिता हा आपल्याला या जगात आणताे आणि म्हणूनच हे जग दिसते.
त्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
 
2. उपनयन करणारा - उपनयन संस्कार म्हणजे ज्याला माैंजही म्हटले जाते. यावेळी जे संस्कार केले जातात, जी गायत्री मंत्राची संथा दिली जाते त्याने ‘दुसरा’ जन्म हाेताे. म्हणून हा दुसरा पिता.
 
3. विद्यादान करणारा - जन्म झाल्यावर बुद्धीचे पाेषण हाेते, डाेळ्यांनी जग दिसते; परंतु विद्यादानाने जगाकडे पाहण्याची दृष्टी मिळते. बुद्धीवर संस्कार हाेऊन वैचारिक क्षमता वाढते म्हणून विद्यादान करणारा गुरू हाही पिताच हाेय.
Powered By Sangraha 9.0