गीतेच्या गाभाऱ्यात

14 Mar 2023 16:53:54
 
 
पत्र आठवे
 

Bhagvatgita 
तू म्हणतेस की, निष्काम भ्नती हाेणे कठीण आहे.निष्काम भ्नती हाेत नसेल, तर सकाम भ्नतीदेखील करू नये का? तू असे लक्षात घे की, आरंभी सकाम भ्नती करण्यास हरकत नाही. सकाम भ्नती करता करता देवाबद्दल जास्तीत जास्त प्रेम निर्माण झाले म्हणजे सकाम भ्नतीचे रूपांतर निष्काम भ्नतीमध्ये हाेते.परमार्थात एक मार्मिक गाेष्ट आहे. मला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, म्हणून एक बाई सकाम भ्नती करीत हाेती.सकाम भ्नती करता करता तिला परमेश्वराबद्दल पराकाष्ठेचे प्रेम वाटू लागले. तिच्या स्वप्नात देव आला आणि म्हणाला- ‘‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे पाहिजे ते माग.’’ मला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे म्हणून ती बाई सकाम भ्नती करत असल्यामुळे तिला जे जे पाहिजे ते मागून घेण्याची संधी तिला प्राप्त झाली हाेती.
 
पण ती बाई देवाला म्हणाली- ‘‘देवा, काय पाहिजे म्हणून मला काय विचारताेस? माझ्या हिताच्या दृष्टीने जे चांगले असेल ते तूच ठरव, व त्याप्रमाणे मला दे म्हणजे झाले.’’ त्या बाईची आरंभी सकाम भ्नती हाेती, पण पुढे तिने सारे देवावर साेपविले. देवाबद्दल पराकाष्ठेचे प्रेम निर्माण झाले की, सकाम भ्नतीचेदेखील निष्काम भ्नतीत रूपान्तर हाेते.गुरुदेव रानडे हेदेखील आरंभी सकाम भ्नती करीत.आजारामुळे त्यांना फार दु:ख हाेत असे व ते दु:ख देवाने दूर करावे म्हणून त्यांनी सकाम भ्नती सुरू केली. पुढे त्यांना देवाबद्दल पराकाष्ठेचे प्रेम वाटू लागले व त्यांच्या सकाम भ्नतीचे रूपांतर निष्काम भ्नतीमध्ये झाले.
 
तू जाे धर्माबद्दल प्रश्न विचारला आहेस, त्याबाबत असे म्हणता येईल की, धर्माबद्दल नाना तऱ्हेच्या लाेकांनी नाना तऱ्हेचे विचार प्रदर्शित केले आहेत. धर्मामुळे खरे म्हणजे सुख नि समाधान व्हावयास पाहिजे पण धर्माच्या नावावर किती तरी र्नताचे पाट वाहिले आहेत. गीता वाचून मला वाटते की, अन्त:करणातील दिव्य श्नतीचा आविष्कार म्हणजे धर्म.या कल्पनेचा फैलाव झाला म्हणजे सुखाचे साम्राज्य निर्माण हाेईल.काही लाेक म्हणतात की, गुरूच्या बाबतीत शीलाला काही महत्त्व नाही याबाबतीत तुला माझे मत पाहिजे आहे.
 
आपणाला रसायनशास्त्र, गणितशास्त्र वा अन्य एखादे भाैतिकशास्त्र शिकावयाचे असेल तर गुरूचे शील एकवेळ कसेही असले तरी चालेल. त्याला याेग्य ज्ञान असेल तर ताे ते शास्त्र आपणास शिकवू शकेल. शील नसतानाही एखाद्याजवळ प्रचंड बाैद्धिक सामर्थ्य असू शकते. परमार्थाच्या बाबतीत वेगळा प्रकार आहे. जाे शुची नाही अथवा ज्याचे शील चांगले नाही त्याच्याजवळ खरे आध्यात्मिक तेज असू शकत नाही. परमार्थ प्रांतात जाे गुरू करावयाचा त्याचे शील चांगले असणे जरूर आहे.तू अनुभवाबद्दल विचारले आहेस.याबाबतीत असे लक्षात घे की परमार्थ मार्गात निरनिराळे अनुभव येतात.ध्यान करीत असताना आपण डाेळे मिटले असूनही केव्हा केव्हा आपल्या अगदी जवळ सूर्य येताे.
Powered By Sangraha 9.0