दाेन गाेष्टी साेप्या आहेत अर्जुनाला याेगी बनवू नका, बेहाेश करा, आणखी भाेगी बनवा, तरी ताे युद्धाला जाईल.दुसरी ही श्नयता आहे की त्याला याेगी बनवला तर ताे युद्ध साेडून वनात निघून जाईल. या दाेन गाेष्टी अगदी साेप्या आहेत, अन् संभाव्य आहेत. या दाेन्ही अगदी सहज श्नय आहेत.दाेहाेंतलं काहीही करा. त्याला भाेगाची लाच द्या की ताे युद्धाला जुंपलाच, याेगी बनला की वनात गेलाच.कृष्णाचा एक असंभव प्रयास चालू आहे.म्हणूनच गीता हा एक खूपच असंभव असा प्रयास आहे. असंभव असण्यामुळेच, अद्भुत आहे.
असंभव असण्यामुळेच ताे इतका उच्च अन् ऊर्ध्वगामी आहे. ताे असंभव प्रयास हा आहे की अर्जुना तू याेगीही हाे आणि लढाईतही उतर. तू बुद्धासारखा तर हाे पण धनुष्यबाण देखील साेडू नकाेस. बुद्धासारखं हाेऊन बाेधिवृक्षाखाली बसणं हे काहीच अवघड नाहीये. पण बुद्ध हाेऊन युद्धात, समरांगणात उभं राहणं, युद्धाच्या क्षणात उतरणं ही खरी अडचण आहे. म्हणून कृष्ण सगळेच दरवाजे ठाेठावत आहे. की काेठूनही अर्जुनाला प्रकाश दिसावा. या सूत्रात त्याला कृष्णानं असं सांगितलं की तू मित्र व शत्रू यांच्याबाबतीत समबुद्धी हाेऊन जा म्हणजे तू याेगाला उपलब्ध हाेशील.
याेगी युत्र्जीत सततमात्मानं रहसि स्थितः । एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ।।10।।