आपल्या घरात शुद्ध वातावरण व पवित्र आचरण असावे

13 Mar 2023 14:44:03
 
 

Gondavlekar 
आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे.आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार, इत्यादी सर्व काही यश संपादन करा; अगदी एखाद्या राजयाेग्याप्रमाणे प्रपंचात ऐषआरामात राहून गाद्यागिरद्यांवर लाेळा; पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. काेणाशी वाद घालीत बसू नका.जगाचा मान ार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्यामागे लागताे. नंतर मान मिळविण्याची कृति थांबते आणि मानही नाहीसा हाेताे.जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात हाेताे, जगाला ते भारी असतील, पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही.
 
प्रेमांत गुंतू नका, तसेच द्वेषमत्सरांतही गुंतू नका; दाेन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला, आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे ताे भाऊबंद मेला, दाेघेही मेल्याचे सुतक सारखेच! त्याचप्रमाणे, मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच हाेते. भगवंताचा विसर हा काेणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही; मग प्रपंचात सुखसाेयी असल्याने ताे हाेवाे किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे हाेवाे. ढाेंग, बुवाबाजी, इत्यादीच्या भानगडीत तुम्ही पडू नका; अगदी काहीही न केलेत तरी चालेल, पण ढाेंग मुळीच करू नका; आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा, अगदी अनुभवाने मी सांगताे, की बुवा हाेण्याच्या ंदांत तुम्ही पडू नका.
 
आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करुन त्याचे अनसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ति बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरूरी आहे. आपण सर्वजणे सत्संगतीमध्ये आहाेत असे म्हणताे, मग आमची वृत्ति का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही, म्हणून आमची वृत्ति सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गाेपींकडे पाठविले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या हाेत्या. गाेपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवालाही आश्चर्य वाटले. नामामध्ये भगवंत त्यांना दिसत असे, ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले,‘देवा, तू मला ज्ञान दिलेस खरे, पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे. ते तू मला दे.’ खराेखर, त्या नामाचे माहात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात; इथून रामाजवळून काही मागून न्यायचेच असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा.
Powered By Sangraha 9.0