बाेलताना सांभाळूनच बाेलावे. कारण शत्रूला आपली दुर्बलता समजल्यास ताे त्यावरच आघात करणार हे निश्चित. जसे महाभारतात महाराणी गांधारी मातेच्या तेजस्वी नजरेने लाेहपुरुष बनलेल्या दुर्याेधनाच्या दुर्बल जांघेवर भीमाने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून प्रहार करून त्याचा वध केला.
3. देश - देश आपला, परका कसा (मित्र राष्ट्र/शत्रू राष्ट्र) आहे, त्याप्रमाणे (जैसा देस, वैसा भेस) सांभाळूनच वागावे.
4. आय - व्यय-आपली आमदनी (उत्पन्न) आणि हाेणारा व्यय (खर्च) याचा विचार (हिशाेब) करूनच प्रत्येकाने व्यवहार करावेत. उत्पन्नापेक्षा खर्च नेहमी कमीच असावा; ‘ऋण (कर्ज) काढून सण साजरे करू नयेत.’
5. ‘मी काेण?’ - भल्याभल्यांना पडलेल्या ‘काेऽहं’ चे उत्तर शाेधण्याचा प्रयत्न करावा