पत्र आठवे
देता येण्यासाठी तू घेत जा. सूर्य सागरापासून पाणी घेताे व पर्जन्यरूपाने परत देताे. सागराचे पाणी खारट असते पण पर्जन्याचे पाणी गाेड असते. आपणदेखील अशीच देव-घेव करायला पाहिजे.तुझा पुढचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे.देवाचे नाम घेत असताना नाना तऱ्हेचे विकल्प मनात येतात. निर्विकल्प कसे व्हावे असा तुझा प्रश्न आहे.निर्विकल्प याचा अर्थ काेणताही विचार मनात आणणे नाही असा काही लाेक करतात. दुसरे काही म्हणतात, की ही गाेष्ट अश्नय आहे.तू असे लक्षात घे की, देवाशिवाय काेणताही विचार मनात आणणे नाही म्हणजे निर्विकल्प हाेणे. देवाच्या विचाराने तू आपले मन भरून टाक म्हणजे निर्विकल्प हाेशील व तुला पराकाष्ठेचा आनंद मिळेल.13 काेटी जपाने देव प्राप्त हाेताे असे म्हणतात ते खरे आहे का? असा तुझा प्रश्न आहे.
केवळ 13 काेटी जपाने देव प्रसन्न हाेत नाही. तेरा म्हणजे (तुझा) काेटी म्हणजे (दशा)- मी देवाचा आहे अशी जेव्हा भ्नताची आत्यंतिक स्थिती हाेते. तेव्हा देव दिसताे.देवाचे दर्शन हाेण्याच्या बाबतीत आसनमुद्रा इत्यादिकांचा थाेडा उपयाेग हाेताे हे खरे आहे. पण देवदर्शनाच्या बाबतीत भ्नित-भाव मुख्य. भ्नित-भाव नसेल, तर आसन- मुद्रादिकांचा काही उपयाेग हाेणार नाही.गुरू फ्नत नाम देईल. पण पुढचा प्रयत्न आपणच करावयाचा असताे.एका माणसाने गुरुदेव रानडे यांना पत्र लिहून विचारले की, ‘‘एकनाथांनी एका साधकाच्या डाे्नयावर हात ठेवून त्याला माेक्षप्राप्ती करून दिली, तसे आपण करू शकाल का?’’ गुरुदेव म्हणाले, ‘‘एकनाथांनी एका साधकाच्या डाे्नयावर हात ठेवून त्याला माेक्षप्राप्ती करून दिली, या गाेष्टीला दंतकथेवाचून दुसरा पुरावा नाही. सद्गुरू मार्ग दाखवेल, साधन देईल पण ताे साक्षात्कार हाती देत नाही. असले सामर्थ्य मला नाही.
शिष्याने आपल्या प्रयत्नाने साक्षात्कार प्राप्त करून घ्यावयाचा असताे.तुझ्या पुढील प्रश्नाचे उत्तर असे की, जगाला केव्हा केव्हा उलटे चांगले दिसते.प्रख्यात संशाेधक आइन्स्टिन यांना फावल्या वेळात चित्रे काढण्याचा नाद हाेता. एकदा माेठी चित्रस्पर्धा जाहीर करण्यात आली. आइन्स्टिनच्या काही भ्नतांनी त्यांनी काढलेले एक चित्र त्यांना न सांगता पळवून नेले आणि स्पर्धेसाठी पाठवून दिले. आइन्स्टिनना पहिले बक्षीस मिळाले व असे जाहीर करण्यात आले की, नवचित्राच्या प्रकारामध्ये ते चित्र फार सुंदर आहे.ताे निकाल ऐकून आइन्स्टिनना आश्चर्याचा ध्नका बसला. जेथे बक्षीस मिळालेली चित्रे टांगून ठेवली हाेती तेथे आइन्स्टिन गेले व त्यांना कळून आले की त्यांनी जे आपल्या वडिलांचे चित्र काढले हाेते ते उलटे ठेवले हाेते व त्याच उलट्या चित्रास पहिले बक्षीस जाहीर करण्यात आले हाेते.