ताे अर्जुनाला म्हणताे की तू याेगी हाेऊन लढ, तटस्थ हाेऊन लढ, समत्वबुद्धीला उपलब्ध हाेऊन लढ. आपले अन् परके यांच्यातलं अंतर साेडून दे. फळ काय मिळेल याची चिंता साेड. तुझी मनस्थिती काय आहे, त्याची फिकीर कर. काेण मरेल, काेण वाचेल, ही काळजी साेडून दे. काेणी मराे, काेणी वाचाे, एवढंच नाही, तूसुद्धा एखाद्यावेळी मरशील वा वाचशील, पण जन्म व मृत्यू यात तुला काही फरक असू नये. तू समत्वाला उपलब्ध हाेशील एवढंच बघ. सफलता येवाे वा असफलता, विजय मिळाे वा पराजय, तू दाेहाेंना समभावानं स्वीकारलं पाहिजेस. तुझ्या मनाची ज्याेती थाेडीशीही कंपित हाेता कामा नये. तू निष्कंप हाे.
युद्धाच्या क्षणी एखाद्याला याेगी बनवण्याची ही धडपड माेठीच अश्नय, असंभव आहे. म्हणून कृष्णासारखे लाेक नेहमीच असंभव गाेष्टीमागे लागलेले असतात. त्यांच्यामुळे जीवनात काही चमक आहे, चैतन्य आहे. त्यांच्याचमुळे, अश्नयाच्या मागे लागणाऱ्यांच्यामुळेच काट्यांच्या या जीवनांत एखादं फूल उमलत आलेलं आहे, आणि जीवनाच्या काेलाहलात कुठं कुठं एखादं गीत जन्माला आलं आहे. असा हा असंभवाचा प्रयास, एका असंभव क्रांतीची आकांक्षा आहे, दि ्नवेस्ट फाॅर दि इंपाॅसिबल रिव्हाेल्युशन की अर्जुनाने याेगी हाेऊन लढाईला जावे.