पण तसं काहीएक कृष्णाने केलं नाही.अर्जुनाला काेणतीतरी नशा चढवून लढाईला तयार करण्याचा प्रश्न नव्हता, काही तरी करून चिंतेपासून वाचवायचा प्रश्न नव्हता.तर त्याला निश्चिंत बनवण्याच्या विधायक प्रक्रियेचा प्रश्न हाेता. ताे चिंतामु्नत हाेऊन युद्धास सिद्ध व्हावा एवढाच कृष्णाचा प्रयत्न नव्हता, तर त्याने याेगारूढ व्हावं, याेगस्थ व्हावं, याेगी व्हावं असा हाेता. ताे याेगी हाेऊन युद्धात उतरला, तरच ते युद्ध धर्मयुद्ध बनणार हाेतं. नाहीतर ते धर्मयुद्ध बनणार नव्हतं.जगात जेव्हा जेव्हा दाेन माणसं लढतात, तेव्हा कधीतरी असं हाेऊ शकतं. प्रमाणाचा थाेडाफार फरक पडताे.
काेणी जास्त अधार्मिक वा कुणी कमी अधार्मिक, परंतु एक धार्मिक आणि दुसरा अधार्मिक असं फार ्नवचित हाेतं.अधार्मिकपणातच कमीजास्त प्रमाण हाेऊ शकतं, काेणी पंच्याण्णव ट्नके अधार्मिक तर दुसरा नव्वद ट्नके अधार्मिक. पण युद्ध नेहमी धर्म आणि अधर्म यांच्यातच हाेत असतं.कृष्णाला एक वेगळाच प्रयाेग करायचा आहे. जगाच्या इतिहासात हा पहिलाच प्रयाेग असावा. अन् त्यानंतरही आजवर याला समांतर असा दुसरा प्रयाेग झालेला नाही. ताे प्रयाेग हा आहे की युद्धाला धर्मयुद्ध बनविण्याची जादू अर्जुनाला द्यायची आहे.