पत्र आठवे
‘‘माझ्या धर्मावर श्रद्धा ठेवणारा एक मनुष्य वाढल्याने मला पुत्रजन्माचा आनंद झाला आहे.’’ तू फाेटाेबद्दल विचारले आहेस. खरं सांगू? या बाबतीत तू साॅके्रटीसचे उदाहरण लक्षात घे. साॅक्रेटीसचे चित्र काढण्याकरता एक चित्रकार आला. ताे म्हणाला, ‘‘हा देह परमेश्वराची छाया आहे; त्या छायेची आणखी छाया घेण्याचे कारण काय?’’ (why take the replica?) तू साक्षात्काराबद्दल प्रश्न विचारला आहेस. त्या बाबतीत असे समजून घे की, साक्षात्काराच्या बऱ्याच पायऱ्या असतात.सर्वसामान्य लाेक वद्यपक्षात असतात. तर साक्षात्कारी लाेक शुद्ध पक्षात असतात.शुद्ध पक्षातील चंद्राचा प्रतिपदेचा प्रकाश, द्वितीयेचा प्रकाश, तृतीयेचा प्रकाश, अशा प्रकाशामध्ये फरक असताे.साक्षात्काराच्या क्षेत्रात देखील असाच फरक असताे.
मनुष्याची श्नती मर्यादित असल्यामुळे त्याला संपूर्ण साक्षात्कार हाेत नाही. गुरुदेव रानडे म्हणतात की, संपूर्ण साक्षात्कार काेणालाही हाेऊ शकत नाही.तुझा पुढचा प्रश्न विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचा आहे. त्या बाबतीत खरे नि स्पष्ट सांगायचे म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे काेडे अद्याप काेणालाच सुटले नाही. जगाच्या उत्पत्तीसंबंधी चिद्विलास, माया, अविद्या वगैरे विचार प्रचलित आहेत.पाैर्वात्य आणि पाश्चात्य विचार समजून घेतल्यानंतर असे दिसते की, विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी निरनिराळे विचार म्हणजे बुद्धीच्या उड्या आहेत. पण हे काेडे निश्चित अद्याप काेणालाच सुटले नाही.बादरायण म्हणतात, ‘‘विचित्राे ऽ यं संसार :’’ (विश्व म्हणजे एक परम आश्चर्य आहे) एका गृहस्थाने गुरुदेव रानडे यांना पत्र पाठविले की, विश्वाचे काेडे उलगडून घेण्यासाठी मी आपल्याकडे येणार आहे.गुरुदेवांनी ताबडताेब कळविले की, ‘‘तुम्ही अजिबात येऊ नका, कारण मलाच अद्याप विश्वाचे काेडे उलगडले नाही.’’ पुढचा तुझा प्रश्न गुरूबद्दल आहे. या बाबतीत तू असे लक्षात ठेव की, गुरू हा टेलिफाेन ऑपरेटरप्रमाणे आहे.
शिष्य आणि देव यांचे संबंध जाेडून देणे, हे त्याचे काम आहे.अहंकाराबद्दल तू जे विचारले आहेस त्याबद्दल विचार सूत्ररूपाने सांगणेचा झाल्यास, असा सांगता येईल की, ज्या गाेष्टीबद्दल अहंकार वाटताे ती गाेष्ट जितकी सूक्ष्म तितका ताे अहंकार नाहीसा हाेणे कठीण असते.शारीरिक साैंदर्याबद्दल अभिमान स्थूल असताे. पण विद्वत्तेबद्दलचा अहंकार सूक्ष्म असताे. त्यापेक्षाही मी परमार्थी आहे असा जर एखाद्याला अहंकार जडला तर ताे फारच सूक्ष्म असताे. माणसाने परमार्थ करावा; पण परमार्थाचा अहंकार जडला म्हणजे अनुभवाचा नाश हाेत असताे. परमार्थात जास्तीत जास्त किंमत अनुभवाला असते. ज्याला अनुभव नकाे असेल, त्याने परमार्थाचा अहंकार खुशाल बाळगावा.तुझा पुढचा प्रश्न मैत्रीबद्दलचा आहे. या बाबतीत अॅरिस्टाॅटलचे म्हणणे विचारात घेण्यासारखे आहे. त्याने म्हटले आहे की, मैत्री तीन प्रकारची असते.