ओशाे - गीता-दर्शन

01 Mar 2023 23:07:48
 
 

Osho 
 
कारण ज्याची आकांक्षा- मला आणखी थाेडं धन मिळावं अशी-शिल्लक आहे, त्याची काहीच इच्छा शिल्लक नसल्याने ताे वाटू शकत हाेता.एके दिवशी त्याने काही मजूर आपल्या द्राक्षांच्या मळ्यावर पाठवले आणि आणखीही काही मजुरांना गावातून बाेलावून घ्यायला सांगितलं. सूर्याेदयाच्या वेळी काही मजूर मळ्यावर कामासाठी आले; पण तेवढे कमी हाेते. मग त्याने माणूस पाठवून बाजारातून आणखी मजूर आणवले.पण ती माणसं कामावर येईपर्यंत सूर्य चांगलाच वर आला हाेता. डाे्नयावर आला हाेता. दुपारच झाली हाेती. तेवढ्यानंही काम भागणार नव्हतं म्हणून त्यानं आणखी माणसं बाेलावली. ती येईपर्यंत चांगलीच दुपार झाली. इतकंच काय, अगदी संध्याकाळीसुद्धा काही माणसं आली, अगदी सूर्य ढळायच्या वेळी.जेव्हा सूर्यास्तानंतर मजुरी वाटायची वेळ झाली, तेव्हा त्यानं सगळ्या मजुरांना सारखीच मजुरी दिली.
 
सकाळपासून जे मजूर खपले हाेते त्यांचा पारा यामुळे चढला. ते म्हणू लागले-‘आम्ही सूर्याेदयापासून उन्हातान्हात दिवसभर घाम ढाळलासूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि आता आता काही माणसं कामाला लागली आणि तेव्हा सूर्यास्त हाेत आलाच हाेता. त्यांनी काम चालू केलं न केलं तेवढ्यात काम थांबायची वेळ झाली सूर्यास्तामुळे, अंधार पडायला लागल्यामुळे. आणि आम्हा सगळ्यांना तुम्ही सारखीच मजुरी देत आहात, हा आमच्यावर अन्याय आहे.’ यावर त्या मालकाने विचारले, ‘तुम्हाला तुमच्या कामाची मजुरी मिळाली का कमी मिळाली?’ ते उत्तरले, ‘नाही, आम्हाला कमी नाही मिळाली, जास्तच मिळाली आहे.’ मग मालकाने म्हटले, ‘मग तुम्ही या चिंतेत पडू नका. या लाेकांना मी त्यांच्या कामाची मजुरी देत नाहीये, द्यायला माझ्याजवळ खूप आहे म्हणून देताेय.’
Powered By Sangraha 9.0