तै आपण आंग आपण अलंकार। आपण हात आपण हतियार। आपण जीव आपण शरीर। देखे चराचर काेंदलें देवें ।। 11.215

01 Mar 2023 22:58:07
 
 
 
dynaneshwari
श्रीकृष्णांनी दिलेल्या दिव्य दृष्टीने अर्जुनाने विश्वरूप कसे पाहिले, काय काय पाहिले, याचेही वर्णन ज्ञानेश्वर विस्ताराने करतात.अर्जुनाने अनेक मुखे पाहिली.ही मुखे म्हणजे राजमंदिरे अथवा साैंदर्यलक्ष्मीची भांडारेच हाेती.आनंदाची उद्याने जणू काय बहरलेली हाेती. साैंदर्याला राज्य प्राप्त झाले हाेते. यांतील काही मुखे अत्यंत भयंकर हाेती. मृत्यूलाच ताेंडे ुटली आहेत असे वाटत हाेते.भीतीचे किल्लेच जणू निर्माण केल्याची जाणीव हाेत हाेती.प्रलयाग्नीची महाकुंडेच उसळत हाेती. अशीही अद्भुत व भयंकर मुखे अर्जुनाने विश्वरूपात पाहिली.त्याला त्या मुखांचा अंतच लागेना, म्हणून ताे ती पाहण्याचे साेडून काैतुकाने डाेळे पाहू लागला.तेव्हा अनेक रंगांच्या कमळांचे बाग ुलले आहेत असे त्याला वाटले.
 
जेथे डाेळे हाेते तेथे प्रलयकाळची वीज चमकावी तशी पिंंगट दृष्टी दिसत हाेती. त्याने वर चढलेल्या भुवया पाहिल्या. हे सर्व पाहून अर्जुन मनाशी म्हणाला, आता या विश्वरूपाचे पाय काेठे आहेत? मुकुट काेठे आहे? याच्या बळकट भुजा काेठे आहेत? अर्जुनाने या दृष्टीने विश्वरूपाचा आदि व अंत पाहिला.जे विश्वरूप वेदांना कळत नाही, त्याची सर्व अंगे अर्जुनाने डाेळ्यांनी एकाच वेळेला पाहिली. हे विश्वरूप अनेक रत्नांच्या अलंकरांनी शाेभत हाेते.या अलंकारांचे वर्णन काय करावे? ज्या प्रभेने चंद्रसूर्य प्रकाशित हाेतात, तिचेच दागिने जणू काय देवांनी धारण केले हाेते. देव आपणच अवयव, आपणच दागिने, हात, शस्त्र, जीव, देह इत्यादी सर्व बनले हाेते. या विश्वरूपात अर्जुनाने हातांचे पंजे पाहिले, तेव्हा त्यातून अग्नीच्या ज्वालाप्रमाणे शस्त्रे झळकत असताना पाहिली.
Powered By Sangraha 9.0