अर्जुनाच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न भगवंत आणखी करीत आहेत. हे शत्रू पाेकळ साेपटाप्रमाणे आहेत. केवळ निमित्त हाेऊन अर्जुनाने आता त्यांचा नाश करावा असे भगवंतांना वाटते.गर्वाने ुगून मदाेन्मत झालेले शत्रू नाश व्हावेत असे भगवंतांना वाटते. कृष्ण व अर्जुन ह्यांच्यातील हा संवाद धृतराष्ट्राला संजय सांगत आहे. खळखळ करीत वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या बाेलण्याचा ओघ चालू हाेता. मेघांच्या गडगटाप्रमाणे त्यांचे शब्द हाेते. श्रीकृष्णांचे हे बाेलणे ऐकून अर्जुनाची भीती कमी झाली नाही. त्याचे शरीर थरथरा कापू लागले. नम्र हाेऊन त्याने भगवंताला हात जाेडले आणि काही बाेलण्याचा प्रयत्न ताे करू लागला. ताे त्याचा कंठ दाटून आलाे सुखाने का भीतीने याचा निर्णय श्राेत्यांनी करावा असे ज्ञानेश्वर सुचवितात.
अर्जुन देवांना म्हणतात की, देवा तुम्ही ‘मी सर्वभक्षक काळ आहे’ असे म्हणता हे तुमचे बाेलणे आम्ही मान्य करू, पण देवा, तुम्ही जगाचा संहार करावा हे मात्र मला पटत नाही. शरीरातील तारुण्य नाहीसे करावे व त्यास म्हातारपण आणावे हा काेठला न्याय ? देवा, दिवस नुकताच वर आलेला असताना ताे कधी मावळताे काय? आपण काळ आहात हे खरे, पण उदय, मध्य व अस्त या अवस्था आपण सांभाळावयास हव्यात. उत्पत्तीच्या वेळीच सृष्टीचा नाश करण्याचे आपले विचार बराेबर वाटत नाहीत.तू म्हणताेस हे खरे आहे की, आजचे हे जग भाेगाच्या भरात वागत आहे. असे असेल तरी तू कालरूप कृष्ण या जगाचा संहार करशील, हे मला खरे वाटत नाही. हे सर्व म्हणत असताना अर्जुनाच्या मनात देवाविषयी प्रीतीची भावना हाेती.