चाणक्यनीती

08 Feb 2023 17:42:30
 
 

Chanakya 
वाच्यार्थ: दृष्टांच्या गावात वास्तव्य, नीच व्यक्तीची सेवा, वाईट अन्न, सतत भांडणारी पत्नी, मूर्ख पुत्र आणि विधवा कन्या या सहा गाेष्टी माणसाला अग्निशिवाय नित्य जाळत राहतात.
 
भावार्थ : येथे चाणक्यांनी जिवंतपणी मरणयातना देणाऱ्या गाेष्टींपासून दूर राहण्याविषयी मार्गदर्शन केले आहे.1. कुग्राम - वाईट स्वभावाच्या, वाईट कृत्य करणाऱ्या, वाईट चालीरीतींच्या लाेकांसाेबत; तसेच वाईट हवामानाच्या, घाणीच्या गावात राहावे लागणे अतिशय कठीण आहे. कारण, अशा वातावरणात राहिल्याने तेथील हवामानाचा जीवनावर दुष्परिणाम हाेऊ शकताे म्हणून अशा गाेष्टींपासून दूर राहावे.
Powered By Sangraha 9.0