गीतेच्या गाभाऱ्यात

06 Feb 2023 14:12:46
 
 
पत्र दुसरे
 

Bhagvatgita 
 
या म्हणण्यात फारसे तथ्य दिसत नाही. सगळ्याच संतांनी भ्नितमार्गावर जाेर दिला आहे.ज्ञानेश्वरांना वाटते कीखूप ज्ञान आहे, खूप कर्म आहे पण भ्नती नसेल तर प्रकार हाेईल ताे असाखूप पीक आले आहे, कणसे आली आहेत, पण कणसात दाणाच नाही किंवा नगरी चांगली आहे. इमारती उत्तम आहेत पण नगरीत माणसेच नाहीत. किंवा सुंदर स्त्री आहे, पण तिच्यात प्राणच नाही.एकनाथांना वाटते की- भ्नती नसेल तर ज्ञान देखील नकाे.भ्नितप्रेमाविण ज्ञान नकाे देवा। समर्थ रामदास रडवे नाहीत हे सर्वत्रांना मान्य आहे. त्यांनी देखील भ्नितमार्गावर जाेर दिला आहे.
 
ते म्हणतात- मना सज्जना भ्नितपंथेची जावे। तरी श्रीहरी पाविजे ताे स्वभावे।। दासबाेधात ते म्हणतात- भ्नितचेनि याेगे देव। निश्चये पावती मानव। ऐसा आहे अभिप्राव। इये ग्रंथीं।। शंकराचार्यांनी माेक्षकारणसामग्ऱ्यां भ्नितरेव गरीयसी। असे म्हणून भ्नतीवर जास्तीत जास्त जाेर दिला आहेबादशहाने विचारलेसत्ताविसातून नऊ गेले बाकी किती? सगळे लाेक म्हणालेअठरा.बिरबल म्हणाला - पूज्य.ताे नंतर म्हणालासत्तावीस नक्षत्रे आहेत. त्यातून. पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर बाकी पूज्य राहते.भ्नती नवविधा आहे. भ्नतीला नऊ गुण दे.ज्ञानाला नऊ गुण दे. कर्माला नऊ गुण दे. बेरीज हाेते सत्तावीस. या सत्ताविसातून भ्नतीचे नऊ गुण वजा केले तर बाकी पूज्य राहते हे तत्त्व तू लक्षात घे.
 
अशा परिस्थितीत तुकारामांनी भ्नतीवर जाेर दिला आहे ताे याेग्य आहे.एकदा मी ध्यान करत हाेताे. ध्यानात मग्न असताना अंत:करणातून शब्द आलेपैसा गेला थाेडे गेले। प्रतिष्ठा गेली पुष्कळ गेले। भ्नित गेली सर्वस्व गेले। म्हणे राम।। गीतेमध्ये भगवान गाेपालकृष्णांनी देखील भ्नतीवर विशेष जाेर दिला आहे. अकराव्या अध्यायात त्यांनी विश्वरूप दाखविले व अर्जुनास सांगितले कीअनन्य भ्नती असेल तर असे रूप पाहणे श्नय आहे.गीतेचा समाराेप करताना भगवानांनी गुह्यातले गुह्य सांगितले व ते सांगताना भ्नितमार्गावर विशेष जाेर दिला.हे आधार पाहून तुझी खात्री हाेईल कीतुकारामांनी भ्नितमार्गावर जाेर दिला ते अगदी याेग्य केले.
भ्नितमार्गी रडवा असताे ही कल्पनाच मुळी चुकीची आहे.
Powered By Sangraha 9.0