एकाने विचारले, ‘‘आपल्याला ऐकायला हजाराेंची गर्दी असते; पण बदल कुठे घडताेय ? लाेक केवळ ऐकतात आणि पुन्हा संसार-प्रपंचात तेच करू लागतात, ज्यामुळे दु:खी हाेऊन पुन्हा आपल्याजवळ येतात.’’ मी म्हणालाे, ‘‘कथा-प्रवचन हे परिवर्तनाचे माध्यम आहे. हजाराे लाेकांमध्ये बदल घडून येणे अशक्य आहे. कारण, हजार ऐकतील तेव्हा कुठे शंभरजण त्यावर चिंतन करतील, त्यातले दहाजण वागण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातल्या एखाद्यामध्ये बदल हाेईल !’’