पण ज्याच्या आधारे सर्व दु:ख पेलता येणं श्नय हाेतं-तिथे तरी न्नकीच मिळेल अशा भरवशाने पहावे आणि नाही मिळाला आत्मा तर?.. मग त्या दारुण निराशेपेक्षा न पाहिलेलंच जास्त बरं. म्हणून त्या भीतीने आपण आपल्या आत डाेकावूनही पाहत नसताे.आत्मजयी याचा अर्थ, अशी व्य्नती जी आपल्या आत पूर्णपणे पाहू शकते. ती जाणत असते की, तिथे आहे, तिनं पाहिलेलं असतं की तिथे आहे. तिला ताे तिथं मिळालेला असताे.आता ती निर्भय असते. आता छातीत कुणी सुऱ्यानं भाेसकलं तरी ती निर्भय असते, कारण त्या व्य्नतीनं ज्याला जाणून घेतलं आहे त्याच्यापर्यंत हा सुरा पाेहाेचूच शकत नसताे. मृत्यू जर आता तिच्या दाराशी आला तरी ती त्याला आलिंगन देईल. कारण तिला ठाऊक असतं की तिनं ज्याला जाणून घेतलंय त्याला स्पर्श करणं मृत्यूला श्नयच नाही. आता आपण तिला शिव्या घातल्या, तिचा अपमान केला तरी ती व्य्नती हसेल.
कारण तिला ठाऊक असतं की, या शिव्या, हा अपमान त्याच्यापर्यंत पाेहाेचू शकणार नाही. ती आता विजयी झाली आहे, ‘जिन’ झाली आहे.तेव्हा एक तर बाह्य अर्थाने, आपण कुठल्याही बाबतीत आपल्यावर भरवसा ठेवू शकत नसताे, आपल्या वृत्ती आपल्याला जिथं नेतात तिथं जाणं आपल्याला भाग पडतं. आपण संपूर्णपणे परवश असताे, पराधीन असताे आणि एकतर दुसऱ्या या अर्थाने की, आपणास आपला काहीच पत्ता नाही.म्हणून जिवात्मा असे कृष्णाने म्हटले आहे, ज्याने स्वत:ला जिंकलेलं असतं, त्याच्यात परमात्मा सदाच प्रतिष्ठित असताे.ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थाे विजितेंद्रिय:। यु्नत इत्युच्यते याेगी समलाेष्टाश्म कात्रचन:।।