काम हा निसर्गत: मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कामाला पूर्णत: दूर करून ब्रम्हचर्य पालन करायचे म्हणजे तसे अवघड कार्य आहे.ब्रम्हचर्य पालनासारखे अत्यंत अवघड कार्य सर्वांनी करावेच असे अपेक्षित नाही. संसारात राहूनही माणूस कामावर नियंत्रण ठेवू शकताे. नीती-नियमाला अनुसरून कामाचा उपभाेग घेतला तर ते जीवाला बाधक ठरत नाही. पण हा बुद्धिवादी माणूस जेव्हा कामाच्या आधीन हाेताे आणि अनीतीच्या मार्गाने कामपूर्ती करू लागताे, तेव्हा मात्र काम त्याला बाधक ठरताे.
परस्त्री मातेसमान मानावी, हा संतसंदेश कामपिपासूच्या मनाला स्पर्श करीत नाही. अनीतीने कामातुर झालेला व्यक्ति घरात खरे सुख देऊ शकत नाही. स्वत:ची पत्नी कितीही सुंदर असली तरी अशा लाेकांना परस्त्रीशी चाळे करण्यातच आनंद वाटताे.धर्मपत्नीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि परस्त्रीशी संग करणाऱ्या अशा कामपिपांसूबद्दल बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, भाेग स्त्रियेसी देतां लाजें । वस्त्र दासीचें घेऊनि निजे ।। तुकाराम महाराजांच्या या म्हणण्याप्रमाणे अनेक लाेक समाजात वागत असलेले आपणाला पाहायला मिळतात. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448