मनुष्य दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करताे. कारण वय कधी कमी हाेत नाही. ते वाढतच राहाते. तुम्हीसुद्धा तुमचा वाढदिवस बऱ्याचवेळा साजरा केला असेल. कधी घरी, तर कधी हाॅटेलात. आता मी सांगताे ते करून पाहा.तुम्ही तुमचा वाढदिवस एकदा स्मशानभूमीत जाऊन साजरा करा. कारण वस्तीत राहून आयुष्य कधीच समजत नाही. स्मशानात राहूनच ते समजून घेता येते. शरीर स्मशानाचीच तर ठेव आहे आणि स्मशान हे एक असे घर आहे, जिथे राहून सर्वांनाच आराम करायचा आहे.