चाणक्यनीती

27 Feb 2023 18:34:58
 
 
 

chanakya 
वाच्यार्थ: पुत्राशिवाय घर, आप्तांशिवाय दाहीदिशा (जग), मूर्खाचे हृदय आणि दारिद्र्य या गाेष्टी शून्याप्रमाणे आहेत.
भावार्थ : काेणत्या गाेष्टी शून्यवत आहेत, हे चाणक्यांनी येथे नमूद केले आहे.
1. पुत्राशिवाय घर - मानव हा समाजशील प्राणी आहे. त्याच्यासाठी काही संस्था आवश्यक आहेत; त्यातील एक म्हणजे कुटुंबसंस्था. मुले-बाळे झाली तरच कुटुंब पूर्ण हाेते, घराला घरपण येते.
पुत्रजन्माचा आनंद, त्याच्या बाललीला, त्याचा पुढील प्रवास, राेज नवीन गाेष्टींनी घरात आनंदी वातावरण राहते; पण अपत्याशिवाय असणाऱ्या घरात पती-पत्नीचे परस्परांवर कितीही प्रेम असले, तरी राेजचे तेच ते जीवन, नित्याचे व्यवहार रटाळ, कंटाळवाणे वाटायला लागतात. घर शून्याप्रमाणे (‘अधिक’ काहीच नसल्याने) वाटते.
Powered By Sangraha 9.0