ओशाे - गीता-दर्शन

27 Feb 2023 18:42:56
 
 

Osho 
प्रेम न मागणारा माणूस प्रेम द्यायला समर्थ हाेताे आणि जाे माणूस प्रेम सतत मागतच राहताे. ताे प्रेम द्यायला कधी समर्थ हाेतच नाही. सगळं उलट आहे.आपणा सगळ्यांना असं वाटतं की, आपण प्रेम देण्यास समर्थ आहाेत.वडिलांना वाटतं की मी मुलाला प्रेम देताेय.पण जरा मानसशास्त्रज्ञाला विचारा तर खरं. ताे म्हणताे. ‘वडील मुलाला यासाठीच खुश करताहेत की मुलानंही वडिलांना खूश करावं.’ आता खुश करण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. मुलगा म्हणताे, ‘डॅडी तुमच्यासारखे भ्नकम डॅडी जगात दुसरे काेणीच नसतील.’ मग काय ज्याच्या छातीतील हाडेसुद्धा जागेवर नाहीत. त्या डॅडीची छाती आकाशाएवढी फुगते। मुलगा पण खुश करताे... मुलानंही वडिलांचं प्रेम जर गुपचूप घेतलं. काहीच उत्तर दिलं नाही, तर वडिलांना दुःख हाेतं.
 
मुलानं आईचं प्रेमसुद्धा परत फेडलं नाही, तर आईला पण चिंता वाटते. वाईट वाटतं. दुःख हाेतं. अगदी वार्ध्नयानं खंगलेला माणूसही प्रेमाची परतफेड मागताे.माणसांकडून प्रेम नाही मिळालं तर लाेक कुत्री पण पाळू लागतात. बाहेरून आले की कुत्रा शेपूट हलवून स्वागत करताे. कारण बायका आता अशी शेपूट हलवतीलच असं नाहीये...मुलंही शेपटी हलवतीलच असं नाहीये, शेपटी हलवायची जुनी सर्व व्यवस्था आता काेलमडून पडली आहे. ज्या ज्या देशात असं शेपूट हलवणं माणसं बंद करताहेत. तिथं तिथं कुत्री पाळण्याची फॅशन फाेफावत आहे. ती सब्स्टीट्यूट आहेत.पर्याय आहेत, कुत्रा दरवाज्यात उभा असताे.तुम्ही आलात की ताे शेपटी हलवू लागताे. मग तुम्ही अगदी खूश हाेऊन जाता. कुत्र्याच्या शेपटी हलविण्याने तुम्ही खुश व्हावं हे माेठं आश्चर्याचं आहे. निदान कुत्रा तरी प्रेम देताेय
Powered By Sangraha 9.0