साच विश्वरूप जरी आम्हीं दावावें। तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें।। परि बाेलत बाेलत प्रेमभावें। धसाळ गेलाें ।। 11.161

27 Feb 2023 18:22:22
 
 
 

Dyaneshwari 
भगवंतांनी अर्जुनास आपले विश्वरूप दाखविण्यास प्रारंभ केला.या सृष्टीतील नानाविध प्राणी, त्यांचे आकार, त्यांचे वर्ण इत्यादींचे दर्शन त्यांनी घडविले. हे पाहून अर्जुन भांबावून गेला. खरे पाहता भगवंत विश्वरूप पाहा असे म्हणत असतानाही अर्जुनाला ते नेमके दिसत नव्हते. त्याची दृष्टी सामान्यच हाेती. तरी भगवंत या विश्वरूपाचे वर्णन करीतच राहिले. ते म्हणत हाेते की, या माझ्या विश्वरूपात अनेक सूर्य व सूर्यमाला जमा झालेल्या आहेत. आठ वसू, रुद्रगण, अगणित अश्विनी वैद्य, अनेक वायू इत्यादि पदार्थ विश्वरूपात निर्माण झाले. देवांचे व सिद्धांचे अनेक समुदाय तेथे उत्पन्न झाले. या स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी वेदही समर्थ नाहीत. काळाचे आयुष्यही अपुरे पडते. ब्रह्मदेव सर्वज्ञ खरा, पण त्यालाही या रूपाचा अंदाज लागत नाही. अर्जुना, अशी ही रूपे तू पाहा.
 
आणि काैतुकाने त्यांचे ऐश्वर्य भाेग. ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी शेकडाे अंकुर निर्माण हाेतात, त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी अनेक सृष्ट्या निर्माण हाेतात. परमात्म्याने माेठ्या कारुण्याने आपल्या विश्वरूपाचे वर्णन केल्यावर अर्जुन स्तब्धच राहिला. त्याच्याकडे कृष्णाने पाहिले तेव्हा ताे केवळ उत्कंठित आहे, एवढेच त्यांच्या ध्यानात आले. विश्वरूप त्याला दिसले नाही. हे पाहून देव हसले व अर्जुनाला म्हणाले, विश्वरूप तू पाहातच नाहीस.त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, यात कमीपणा काेणाचा आहे? आरसा एखाद्या आंधळ्यास का दाखविता? देवा, आपण आपले गायनबहिऱ्यापुढे सुरू केले आहे.उगाच काेणावर रागवता? देवा, आम्ही आमच्या चर्मचक्षूंनी विश्वरूप कसे पाहावे? खराेखरच तुम्ही मला पाहाण्याचे साम र्थ्य द्यावयास पाहिजे, पण प्रेमामुळे हे बाेलण्यास विसरलाे.
Powered By Sangraha 9.0