गीतेच्या गाभाऱ्यात

27 Feb 2023 18:57:24
 
 

Bhagvatgita 
 
पत्र सहावे आपण ज्या रथात बसून प्रवास करताे, त्या रथाला जाे घाेडा जाेडला आहे, त्याचे नाव मन! या मनरूपी घाेड्याचे लगाम आपल्या हातात असले तर आपण सुखी हाेताे पण जर लगाम निघून गेले व घाेडा वाटेल तसा भरकटू लागला तर आपण दु:खी हाेताे.
मन फार चंचल आहे, हे तुझे म्हणणे खरे आहे. पण मनाचा असा स्वभाव आहे की, त्याला एखाद्या ठिकाणी गाेडी लागली की, गुळाला मुंगळा चिकटावा त्याप्रमाणे मन तेथेच चिकटते. आपल्या अंत:रंगात दिव्य श्नती आहे त्या ठिकाणी राेज मनाला नेण्याचा प्रयत्न करावा. पुढे पुढे मन तेथे चिकटून बसते आणि नंतर जीवनाच्या प्रवासात मार्गामध्ये दु:खाचे काटे असले तरी आपल्या पायात ईश्वरप्रेमाचे जाेडे असल्यामुळे ते दु:खाचे काटे आपणास बाेचत नाहीत.
 
पाश्चात्य लाकांनी गीतेचा खूप सखाेल अभ्यास केला आहे. काही लाेक म्हणतात की, Geeta deals with ethics and not with metaphysics दूसरे काही लाेक म्हणतात की, Geeta gives western solution of eastern problems.ह्नसले याने म्हटले आहे की, ‘‘गीता ही फ्नत हिन्दूच्याकरिता नसून साऱ्या मानव जातीकरता आहे.’’ सखाेल अभ्यास केला म्हणजे असे दिसते की, गीतेने जाे धर्म सांगितला आहे, ताे धर्म म्हणजे मानवधर्म. गीतेचे तत्त्वज्ञान साऱ्या मानवाला उपयाेगी पडणारे आहे.कृष्णाने गीतेमध्ये काय सांगितले, त्याच्या तात्पर्याबद्दल खूप वाद आहेत. मला वाटते त्या तात्पर्याचे चर्वितचर्वण करण्यापेक्षा तू गीतेच्या तत्त्वज्ञानाचा थाेडा-फार अनुभव घे.तत्त्वज्ञानाच्या प्रान्तांत खरी किंमत अनुभवाला आहे.असे म्हणतात की, Example is better than perceptपण ह्या म्हणण्याला पुस्ती जाेडली पाहिजे. ती अशी की, "Example is better than percept but experience is better than either."
 
‘ नामदेवांनी म्हटले आहे की, ‘‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी।।’’ आपण गीतेच्या तत्त्वज्ञानात रंगून गेलाे की, आपल्याला असा अनुभव येताे की, आपल्या स्वप्नात श्रीकृष्ण आला आहे, त्याला आपण मिठी मारली आहे- त्यावेळचा जाे आनंद आहे, ताे कल्पनातीत आहे.तू म्हणतेस की, भ्नत हाेणे साेपे आहे, पण तुझे म्हणणे बराेबर नाही. गीतेच्या 12 व्या अध्यायात भ्नताची 36 लक्षणे सांगितली आहेत. पहिले लक्षण असे आहे की, भ्नत काेणाचाही द्वेष करीत नाही. हे लक्षण किती अवघड आहे पाहा? ती लक्षणे तू नीट वाचून पाहा म्हणजे तुला कळेल की, भ्नत सर्वांशी मित्रत्वाने वागणारा असला पाहिजे. त्याला अहंकार असता कामा नये. सुख अगर दु:ख त्याला सारखेच वाटले पाहिजे, त्याने कशाचीही अपेक्षा करता कामा नये, मान हाेवाे, अपमान हाेवाे त्याला सारखेच वाटले पाहिजे. निंदा व स्तुती त्याला समान वाटली पाहिजे.
Powered By Sangraha 9.0