समाजात असे अनेक लाेक असतात की ज्यांना चांगल्या कार्याच्या वेळी झाेप येते, आळस येताे आणि वाईट कार्याच्या वेळी मात्र हे लाेक परिपूर्ण जागे असतात. एखाद्या प्रवचन, कीर्तनाला चला म्हटलं तर अनेक लाेक कांही तरी बहाणा सांगून टाळतात. पण याच वेळी त्यांना तमाशा, किंवा अन्य मनाेरंजनात्मक कार्यक्रमाला चला म्हटलग तर हे लाेक लगेच हाेकार देतात.खरे म्हणजे हे सर्व ज्याच्या त्याच्या मनाेवृत्तीवर अवलंबून आहे. काेणत्या कार्याच्या वेळी आळस करायचा आणि काेणत्या कार्याच्या वेळी तत्पर राहायचे हे ज्याने त्याने ठरवायचे असते.
चांगल्या गाेष्टी आत्मसात करण्यासाठी चांगल्यांच्या सहवासात जावे लागते. चांगल्यांच्या सहवासात जाण्यासाठी मानसिकता सकारात्मक असावी लागते. चांगल्या वाईटातला फरक कळण्याची पात्रता असणारा माणूस जेव्हा चांगल्या कार्याच्या वेळी आळस, निद्रा करताे आणि नीतीबाह्य कामाच्या (भाेगाच्या) वेळी कुत्र्याप्रमाणे काळ, वेळ न पाहाता खडबडून जागा हाेताे. अशा लाेकांबद्दल बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, कथाकाळी निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ।। जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448