ओशाे - गीता-दर्शन

25 Feb 2023 22:26:53
 
 
 

Osho 
आपण प्रेम देत आहाेत हा भ्रम आपणा सगळ्यांनाच झालेला असताे. पण आपण मुळी प्रेम देता ते यासाठी देता की, परतून आपल्याला प्रेम मिळावं म्हणजे आपण फ्नत गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट करता-प्रेम देत नाही. आपण फ्नत व्यवसायात गुंतून जाता.मला प्रेम परत मिळावं या हेतूने जर मी प्रेम देत असेन किंवा प्रेम दिल्याशिवाय प्रेम मिळणार नाही असं जर असेल, तर मग मी फ्नत साैदा करीत आहे.माझा प्रयत्न तर प्रेम मिळवणं हाच आहे. देताेयच यासाठी की दिल्याशिवाय मिळणार नाही. हे माझं दिलेलं प्रेम माश्यांसाठी लावलेल्या गळासारखंच आहे. फ्नत कामटीला गळ लटकावायचा आणि बसायचं. मासळीला वाटत असतं, चला बरं झालं! आयतंच काेणीतरी आपल्याला जेवण वाढून ठेवलंय, तर मग बरंच झालं;
 
पण वरपांगी फ्नत गळ दिसत असला, तरी आत काटाच आहे. मासळी गळाला लागेल तेव्हा तिला वाटेल की हा गळ आहे, पण ताेवर काटा तिच्या प्राणंतिक वेदना पण चालू करील. असं कुणाला पकडायचं असलं तर काट्यालाच पीठ लावून गळ तयार करावा लागताे.मला जर काेणाकडून प्रेम घ्यायचं असेल अन् काेणावर मालकी कायम करायची असेल तर मला आधी गुडघे टेकून प्रेम निवेदन करावं लागतं.हाच ताे गळ. तेव्हा दुसरं सूत्र आपण असं लक्षात घ्यायला पाहिजे की, जाेवर काेणीतरी मला प्रेम द्यावं ही आकांक्षा आहे ताेवर आपण बालक आहात.तरुण आहात. आपला विकास अजून झालेला नाही. प्रेम मिळविण्याचा प्रश्नच ज्याच्याबाबत उरत नाही. ताे विकसित माणूस आहे. त्याला प्रेम मिळालं नाही तरी ताे जगू शकताे. ज माणूस जगात प्रेम मागत नाही ताे परिप्नव असताे. आणि माेठी गंमतीची गाेष्ट अशी की यातूनच तिसरं सूत्र निर्माण हाेतं.
Powered By Sangraha 9.0