गीतेच्या गाभाऱ्यात

25 Feb 2023 22:22:50
 
 

Bhagvatgita 
पत्र पाचवे ही गाेष्ट हृदयाला जाऊन भिडणारी आहे. बायकांना कंजूष म्हणणाऱ्या लाेकांनी ही गाेष्ट जरूर वाचावी.तू असे लक्षात घे की, गीता ही माता आहे. तू आपल्या डायरीत टिपून ठेव.‘‘गीता आह्यां असे माता जीवन मंदिरीं अता’’ स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ याबद्दल खूप वाद आहे. पण जेव्हा माता श्रेष्ठ का पिता श्रेष्ठ असा वाद सुरू हाेताे, तेव्हा निकाल एकच की, माता श्रेष्ठ. आपण भ्नितप्रेमात रंगून गेलाे की, ‘‘विठूबाबा किंवा ज्ञानाेबा-बाबा’’ असे न म्हणता ‘‘विठाई-माऊली किंवा ज्ञानाेबा- माऊली’’ असे म्हणताे, यातील मर्म लक्षात घेण्यासारखे आहे.नेपाेलियनने असे म्हटले आहे की,‘‘एका ताजव्यात माझ्या आईला घातले व दुसऱ्या ताजव्यात सारे जग घातले तरी माझ्या आईचे पारडे अधिक जड हाेईल.’’ थॅकरेने म्हटले आहे की, ‘‘माता हे देवाचे नाव आहे.’’ केव्हा केव्हा मला असे वाटते की, मातेचे ठिकाणी चातुर्य शहाणे हाेते, प्रेमाला गाेडी येते आणि सुखाचे साैभाग्य पुष्ट हाेते. मातृत्व म्हणजे प्रेमाचे माहेर, भ्नतीचे जिव्हार आणि सुखाचे रत्न-भांडार आहे.मातेच्या थाेरवीबद्दल तुला एक नितांत सुंदर गाेष्ट सांगताे.
 
‘‘अश्वत्थाम्याने द्राैपदीच्या पाच मुलांची झाेपेत हत्या केली.अश्वत्थाम्याला पकडून द्राैपदीपुढे आणले आणि विचारले, ‘‘याला काय शिक्षा करू?’’ द्राैपदी म्हणाली,‘‘माझ्या मुलांच्या मृत्यूमुळे मी दु:खीकष्टी आहे. अश्वत्थाम्यास मारले तर त्याची आई, तुमची गुरूपत्नी - दु:खीकष्टी हाेईल. त्या मातेला दु:खी करण्याची माझी इच्छा नाही. त्याला साेडून द्या.’’ हे पहा, मातेची थाेरवी अशी असते. तत्त्वज्ञानाच्या बाबतीत गीता अशीच माता आहे. तिच्या तू कुशीत जा म्हणजे जास्तीत जास्त सुख तुला मिळेल. असाे. बाकीचा मजकूर पुढील पत्री! तुझा राम पत्र सहावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले.काही लाेक म्हणतातजीवनात आनंद नाही.दुसरे काही म्हणतातजीवनात स्वारस्य नाही.तिसरे काही म्हणतातजीवनात मजा नाही.तू लिहितेस- ‘‘घरदार पैसा असूनही काही काही लाेक वरील उद्गार काढतात, हे असे का? याचे कारण काय?’’ हे पाहाघाेडा अडला का? पान सडले का? भाकरी करपली का? ह्या साऱ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे. ते उत्तर म्हणजे- फिरवलं नाही म्हणू
Powered By Sangraha 9.0