ओशाे - गीता-दर्शन

23 Feb 2023 17:33:18
 
 

Osho 
 
पहिलं सूत्र- जाे काेणी स्वतःसाठी दुसऱ्या काेणाचेही शाेषण करीत नाही. ताेच शत्रू-मित्र यामध्ये समभाव ठेवण्यात यशस्वी हाेऊ शकेल. जी व्य्नती स्वतःसाठी दुसऱ्या काेणाचीही पिळवणूक करत नाही. अशीच व्य्नती, जाे आपल्या उपयाेगी पडताे. त्यालाच तर आपण मित्र म्हणताे. अशी म्हण आहे की, संकटकाळात मित्राची परीक्षा हाेते. म्हणजे जाे आपल्या उपयाेगी पडताे ताे मित्र आणि जाे आपल्या कार्यात अडथळे आणताे ताे शत्रू, यापेक्षा काही फरक आहे का? म्हणूनच मित्राचा कधीही शत्रू हाेऊ शकताे, त्यानं कार्यात अडचण आणली की ताे शत्रू झालाच म्हणून समजा. अन् जर शत्रूनेही तुमच्या कामात मदत केली तर ताे मित्र बनताे. जर तुमचं काहीही काम असेल तर मग समभाव ठेवणं तुम्हाला अश्नय आहे.काेणी माझा मित्र व्हायला, विराेधी व्हायला माझं काही कामच नाहीये. असे जाे म्हणताे ताेच शत्रू-मित्र यामध्ये समभाव ठेवू शकताे. जाे म्हणताे की, मला हे जीवन स्वप्नासारखं आहे.
 
सत्य नाहीये. हे जीवन म्हणजे एक रंगमंच आहे.आणि मी इथे नाटक खेळताेय. काही काम वगैरे करत नाही. असं ताे म्हणताे, जाे जीवनाकडे कमी प्रमाणात का हाेईना गंभीरपणे पाहताे आणि म्हणताे, ‘हे काम मला करायचंय.’ ताे मित्र-शत्रूंच्या बाबतीत समभाव बाळगूच शकत नाही. कारण त्याच्या त्या कामामुळेच शत्रूंबद्दल आणि मित्रांबद्दल वेगवेगळे भाव ठेवणे त्याला भाग पडत असते. या पृथ्वीच्या पाठीवर मला जर काही काम करायचं असलं. मला काही करायचं आहे, साधायचं आहे अशी भूमिका असली तर मी मित्र-शत्रूंच्या बाबतीत समभाव अजिबात बाळगू शकणार नाही. या पृथ्वीवर माझं काहीही काम नसेल तेव्हाच मित्र-शत्रूंच्या बाबतीत माझा समभाव हाेऊ शकताे. मला कुठं पाेहाेचायचं नाहीये. काही करून दाखविण्याचा हव्यास मला नाहीये.
Powered By Sangraha 9.0