अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें। आणि तेंचि दावूं तरि काय दाविलें।। आतां देखें आघवें भरिलें। माझ्याचि रूपीं ।। 11.123

23 Feb 2023 17:21:34
 
 

Dyaneshwari 
अर्जुनाची विश्वरूपासाठी तयार झालेली उत्कंठा पाहून भगवंतांनी हे गुह्यरूप त्याला दाखवण्याचा विचार केला. या अर्जुनाचे भाग्य केवढे अपार आहे! श्रीकृष्ण परमात्मा सर्व ब्रह्मांडांना व्यापून आहे हे अर्जुनाच्या ध्यानात येत गेले. श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप आणि आपले वैभव एकदम प्रकट केले.अर्जुन पाहू शकेल की, नाही याचाही प्रेमळ कृष्णांनी विचार केला नाही. अर्जुनास पहा, पहा असे ते म्हणत राहिले. ते म्हणाले, अर्जुना, विश्वरूप दाखवा असे तू म्हणावेस आणि ते आम्ही दाखवावे यात माेठेसे काय आहे?
 
तू आता पाहा की, हे सर्व विश्व मीच भरून राहिलाे आहे. पाहा की, काही रूपे राेडकी आहेत. काही लठ्ठ, काही ठेंगू, काही सडपातळ, काही विस्तृत, काही अमर्याद, काही प्रेमळ, काही उदासीन, काही कडक, काही सक्रिय, काही निष्क्रिय, काही सावध, काही धूर्त, काही उदार, काही कृपण, काही सदाचरणी, काही मदाेन्मत्त, काही स्तब्ध, काही आनंदित, काही गर्जना करणारी, काही शांत; अशी ही सृष्टी तू पाहा. या सृष्टीत काही आशावादी आहेत, काही निराशा झालेली आहेत.
 
काही जागे आहेत, काही झाेपलेले आहेत. काही सर्व बाजूंनी संतुष्ट व काही पीडित आहेत. काही हत्याराविना आहेत, तर काही हत्यारी आहेत. काही तामसी आहेत, तर काही प्रेमळ आहेत. काही भयंकर, काही पवित्र, काही समाधीत आहेत. काही निर्मितीच्या क्रीडेत रमलेली आहेत. काहींचा स्वभाव पालन करण्यासारखा आहे.काही सर्वांचा संहार करणारी आहेत. याप्रमाणे अनेक प्राणी दिव्य तेजाने युक्तही आहेत. त्यांची रूपे एकसारखी नव्हती. त्याचे वर्णही एकसारखे नव्हते
Powered By Sangraha 9.0