आपल्या वाणी मध्ये विषही आहे आणि अमृतही.काेकिळा आपल्या मधुरवाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करते; तर कावळ्याचा आवाज कर्णकर्कश ठरताे. वाणीमध्ये विवेक असायला हवा.बंदुकीतून निघालेली गाेळी आणि मुखातून निघालेला शब्द परत घेता येत नाही. आपली इतरांनी कदर करावी असे वाटत असेल, तर वाणी सुंदर हवी. कमी बाेला; पण कामाचं बाेला ! कमी पण प्रभावी बाेलण्यानेच माणसाची पत सुधारते. जास्त बाेलणाऱ्याकडे लाेक कमी लक्ष देतात आणि कमी पण प्रभावशाली बाेलण्याकडे सारेजण आकर्षिले जातात.