ओशाे - गीता-दर्शन

22 Feb 2023 15:16:26
 
 

Osho 
 
ज्या भुतानं तुम्हाला कधी झपाटलं नाही, त्यात समबुद्धी झाल्याचा साक्षात्कार तुम्हाला सहज येईल. पण हा खरा प्रश्न नाहीये की आपण काय म्हणता? खरा प्रश्न हा आहे की, काेणतं भूत तुमच्या मानगुटीवर बसलेलं आहे. जे सतत पाठलाग करतयं ते. तुमचं स्वतःचं भूत काेणतं, पिशाच्च काेणतं हे पाहणं आवश्यक आहे. आधी हे पक्क झालं पाहिजे.तेव्हा खरा प्रश्न तुमच्या द्वंद्वाचा आहे.म्हणून तर कृष्ण वेगवेगळ्या सूत्रांमधून वेगवेगळ्या भुतांची चर्चा करीत आहे. इथं ताे म्हणताे की, शत्रू-मित्र यांमध्ये समभाव माेठी अवघड गाेष्ट आहे. एक वेळ आपण धन-निर्धन यामध्ये समभाव ठेवू शकू. कारण धन निर्जीव आहे हे नीट समजून घ्यायला पाहिजे. एक वेळ यश-अपयश यामध्ये समभाव आणणं साेपं आहे.कारण यश-अपयश ही आपली व्य्नितगत बाब आहे. पण मित्र-शत्रू याबाबत समभाव फार अवघड आहे.
 
कारण आता ती काही केवळ खासगी गाेष्ट नाहीये. आता दुसराही काेणी समाविष्ट झाला आहे.शत्रूही आणि मित्रही. आपण आता एकटे नाही राहिलात. दुसरी व्य्नतीही आता उपस्थित आहे.समाेर धनासारखी निर्जीव वस्तू नाही म्हणूनच हे महत्त्वाचे व अवघड आहे. साेनं आणि माती सारखीच आहेत असं मानणं एकवेळ साेपं तरी आहे, कारण दाेन्ही निर्जीव आहेत; पण शत्रू- मित्र दाेघंही सचेतन आहेत. तुमच्यासारखेच जिवंत आहेत.तुमच्यासारखीच ती चालतीबाेलती माणसं आहेत. तुमच्याच पातळीवर उभी असलेली माणसं आहेत. त्यानं गुंतागुंत जास्त झाली. अवघडपणा वाढला. तर मग शत्रू-मित्र यामध्ये समभाव ठेवण्याची प्रक्रिया काय असेल? मित्र-शत्रू यात जाे समभाव ठेवू शकेल? म्हणून त्याची काही सूत्रे लक्षात घ्यायला पाहिजेत.
Powered By Sangraha 9.0