पत्र पाचवे
यावरून आपल्यास कळून येईल की, ज्ञानयाेग, कर्मयाेग व ध्यानयाेग यांचे विवेचन ऐकून देखील अर्जुनाचे समाधान झाले नाही व त्याचा माेह गेला नाही. अर्जुनाची भूमिका सामान्य माणसाची आहे. सामान्य माणसाला काही आशा आहे का? अशी अर्जुनाची शंका आहे ताे म्हणताे: अयाति: श्रद्धयाेपेताे याेगाच्चलित मानस: अप्राप्य याेगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति।।37।।कच्चिन्नाेभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति। अप्रतिष्ठाे महाबाहाे विमूढाे ब्रह्मण: पथि।।38।। एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषत:। त्वदन्य: संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते।।39।। कृष्णा, श्रद्धा आहे पण संयम नाही म्हणून ज्याचे मन याेगापासून चलित झाले ताे याेगसिद्धी न पावता काेणत्या गतीला जाताे? महाबाहाे, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर स्थिर न झाल्याने दाेहाेकडून भ्रष्ट झालेला पुरुष फुटलेल्या ढगाप्रमाणे नाश तर पावत नाही ना? हे कृष्णा, माझा संशय तूच दूर केला पाहिजेस. तुझ्यावाचून या संशयाचे निराकरण करणारा दुसरा काेणी मिळणार नाही.
या ठिकाणी गीतेला कलाटणी मिळाली आहे. सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लाेकांत भगवानांनी श्रद्धावान माणसाला भरपूर दिलासा दिला आहे. ते म्हणतात: श्रद्धावान्भजते याे मां स मे यु्नततमाे मत: जाे श्रद्धावान मनुष्य मला भजताे ताे यु्नततम आहे, असे माझे मत आहे.हा दिलासा ऐकून अर्जुनाला बरे वाटले. सातव्या अध्यायात एकही प्रश्न न विचारता ताे शांतपणाने भगवानांचे सांगणे ऐकत आहे. आठव्या अध्यायाच्या आरंभी ताे विचारताे: किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषाेत्तम। अधिभूतं च किं प्राे्नतमधिदैवं किमुच्यते।।1।। अधियज्ञ: कथं काेऽत्रदेहेऽस्मिन्मधुसूदन। प्रयाणकाले च कथं ज्ञेयाेऽसि नियतात्मभि:।।2।। हे पुरुषाेत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अधिभूत कशाला म्हणावयाचे? अधिदेव कशाला म्हणतात? अधियज्ञ कसा असताे? हे मधुसूदना, या देहात काेण आहे आणि इंद्रियनिग्रह करणारे लाेक शेवटी तुला कसे ओळखतात?
या प्रश्नांची उत्तरे भगवानांनीआठव्या अध्यायात दिली आहेत. नवव्या अध्यायात भगवानांनी जास्तीत जास्त जाेर भ्नितयाेगावर दिला आहे. भ्नितयाेगाचे त्रिवेचन ऐकून अर्जुन खूश झाला आहे. कृष्णाने ज्ञानयाेग सांगितला, कर्मयाेग सांगितला, ध्यानयाेग सांगितला पण अर्जुनाचे समाधान झाले नाही. भ्नितयाेग ऐकल्यावर त्याला फार बरे वाटले. दहाव्या अध्यायात ताे म्हणताे- विस्तरेणात्मनाे याेगं विभूतिं च जनार्दन। भूय: कथय तृप्तिर्हि शृण्वताे नास्ति मेऽमृतम्।।18।। हे जनार्दना, तुझ्या विभूति व याेग मला विस्ताराने सांग.कारण अमृतासारखे तुझे भाषण ऐकता ऐकता माझी तृप्ती हाेत नाही.दहाव्या अध्यायात कृष्णाने अर्जुनाला आपल्या विभूती सांगितल्या. लाेकमान्य टिळकांनी असे म्हटले आहे की, गीतेच्या अठराव्या अध्यायात त्र्याहत्तराव्या श्लाेकात माझा माेह गेला, अशी अर्जुनाने पावती दिली आहे. अठरावा अध्याय उपसंहाराचा आहे.