ओशाे - गीता-दर्शन

20 Feb 2023 15:57:18
 
 

OSho 
 
स्वत: मात्र पिळदार मिशीचा आकडा ठेवला हाेता आणि ताे दरवाज्याजवळ आरामात आपल्या आसनावर बसत असे. त्याने गावातदवंडी पिटवली हाेती की मिशी वाढवून काेणी त्याच्या समाेरून जाऊ नये. काेणी वाढवलीच तर ती खाली वळवावी.गावात नव्याने आलेल्या व्यापाऱ्यानं नवीन दुकान थाटलं हाेतं. त्यालाही मिशी ठेवण्याचा शाैक हाेता. ताे त्या राजपूत सरदाराच्या घरावरून पहिल्यांदा चालला हाेता. सरदार त्याला म्हणाला, ‘ए व्यापारी पाेट्ट्या, मिशी खाली कर आधी. माझ्या दरवाजासमाेरून काेणीही असं मिशी वर ठेवून जाऊ शकत नाही, समजलं?’ व्यापारी म्हणाला, ‘मी मि शी खाली करणार नाही.’ गाेष्टी एकदम हातघाईवर आल्या. सरदार हातात दाेन तलवारी घेऊन बाहेर आला. राजपूत हाेता म्हणून दाेन आणल्या. एक व्यापाऱ्यासाठी अन् एक स्वत:साठी.
 
व्यापाऱ्यानं तलवार पाहिली. त्यानं तर कधी हातात तलवार धरलीच नव्हती. फक्त मिशीला पीळ द्यायचा शाैक हाेता. त्याने मनाशी विचार केला, ‘हे भलतंच झेंगट झालं.’ व्यापारी राजपूताला म्हणाला, ‘ठीक आहे. मी खुशीनं लढाईत उतरताे.पण एक प्रार्थना आहे, मी जरा घरी जाऊन येताे.’ राजपूत म्हणाला, ‘कशासाठी?’ त्यावर व्यापारी म्हणताे, ‘सांगताे, जर पटलं तर तुम्ही पण तसंच करा.
या लढाईत मला मरण येण्याची शक्यता आहे. मग माझ्या बायकामुलांना दु:ख वाटू नये म्हणून मीच प्रथम त्यांच्या माना उडवून येताे.
जर तुम्हालाही हे पटत असेल की तुम्हालाही या लढाईत मृत्यू येऊ शकेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या बायकामुलांना मारून टाका. म्हणजे मग आपण निश्चिंतपणे लढाई करू.’ राजपूत म्हणाला, ‘ठीक आहे.’
Powered By Sangraha 9.0