विद्वान व्यक्तीचे वचन - अनेक शास्त्र, ग्रंथ वाचून व्यक्ती मनन करते, त्याचे चिंतन करते आणि त्यानंतरच वक्तव्य करते. अशी व्यासंगी, विद्वान व्यक्ती जेव्हा इतरांचे मत खंडन करून आपले मत प्रस्थापित करते तेव्हा ते अंतिम असते, त्यावर दुमत असू शकत नाही. त्यांचा शब्द प्रमाण मानला जाताे.
3. कन्यादान - विवाहात कन्यादान करणे हे विशेष दान असते, हे दान केवळ एकदाच केले जाते.
बाेध : राजाचा आदेश, विद्वानाचे वचन आणि कन्यादान या गाेष्टी एकमेवाद्वितीय आहेत; जसा ‘रामबाण’ अमाेघ आहे. त्यामुळे या गाेष्टी एकदाच कराव्या लागतात.