ज्ञानेश्वरांचा मराठीचा अभिमान या आणखी एका ओवीत प्रकट झाला आहे. संस्कृत भाषेतील कठीण शब्दांचे किनारे ाेडून मराठी भाषेचा घाट चढण्यास सुलभ अशा पायऱ्या बांधून ज्ञानेश्वरांनी निवृत्तिनाथांच्या कृपेने धर्माची खाण मायबाेलीत निर्माण केली मागच्या दहाव्या अध्यायात श्रीकृष्णांनी आपल्या प्रमुख विभूती अर्जुनाला सांगितल्या. या विभूती आपण प्रत्यक्ष पाहाव्यात अशी इच्छा अर्जुनाला झाल्यामुळे आपल्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत प्रयत्नशील राहिले. अकराव्या अध्यायात शांत व अद्भुत अशा दाेन रसांनी भरलेली कथा येणार आहे.कारण यात भगवंतांचे अद्भुत विश्वरूपदर्शन अर्जुनाला घडणार आहे. गीतेतील मूळ रस हा खरे म्हणजे शांत नावाचा आहे.
या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतात की, शांतरसाच्या घरी अद्भुत रस पाहुणचार घेण्यासाठी आला आहे. त्यांच्या पंगतीला इतरही रसांचा मान राखला जाईल. नवरा-नवरीच्या लग्नात त्यांना प्रमुख आहेर केले जातात, पण इतर नातेवाईकांनाही थाेडीार मानाची वस्त्रे मिळतात. त्याप्रमाणे या अध्यायात इतर रसांचाही मान राखला जाईल. पण या अध्यायात मुख्य रस दाेनच, एक शांत व दुसरा अद्भुत. विष्णू व शंकर यांनी एकमेकांना भेटावे त्याप्रमाणे दृश्य येथे दिसेल.अमावास्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब यांच्यात अंतर दिसत नाही, त्याचप्रमाणे या दाेन्ही रसांत ारसा फरक दिसणार नाही. प्रयागमध्ये ज्याप्रमाणे गंगा व यमुना यांचा संगम हाेताे, त्याप्रमाणे येथे अद्भुत शांत रसांचा मिलाप हाेईल.